महावीर जयंतीनिमित्त मिरवणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 02:23 AM2018-03-30T02:23:46+5:302018-03-30T02:23:46+5:30
रायगड जिल्ह्यामध्ये गुरुवारी महावीर जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली
अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये गुरुवारी महावीर जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने संस्था, संघटनांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अलिबाग शहरामधून जैन बांधवांनी मिरवणूक काढली. मिरवणुकीमध्ये आबालवृद्ध, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जैन बांधवांनी आपल्या व्यापाराचे जाळे पसरवले आहे. अलिबाग येथील जैन मंदिर परिसरातून सकाळी मिरवणूक काढण्यात आली होती.
शहरातील विविध भागांतून मिरवणूक मार्गक्र मण करीत महावीर मंदिर परिसरात मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीमध्ये जैन धर्मीयांचे धार्मिक अधिष्ठान लाभलेले गुरू, जैन बांधव, महिला, आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. अलिबाग शहरामध्ये विविध संस्था एकत्र येऊन आज महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केले. रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने स्वागतही करण्यात आले. अलिबाग शहरातील कच्छ युवक संघ मुंबई, कच्छी भवन ट्रस्ट अलिबाग, प्रशांत नाईक मित्रमंडळ, रायगड जिल्हा शिवराष्ट्र संघटना, स्वराज्याचे शिलेदार, अलिबाग रोटरी क्लब, रायगड मेडिकल असोसिएशन, मिनीडोर चालक मालक संघटना, लायन्स क्लब यासारख्या विविध संघटना एकत्र आल्या. त्यांच्यामार्फत शहरातील कच्छी भवन येथे महारक्तदान शिबिर घेण्यात आले. यंदा ३२८पेक्षा जास्त रक्ताच्या बॅगा जिल्हा रु ग्णालयाला देण्यात आल्याचे लायन्स
क्लबचे अध्यक्ष नयन कवळे यांनी सांगितले.
बाजारपेठेतून पालखी
खोपोली : जैन समाजातर्फे खोपोलीत महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जैन मंदिराजवळ पाणपोई उभारण्यात आली.त्याचे उदघाटन नगराध्यक्ष सुमन औसरमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, किशोर पानसरे, समीर मसुरकर, नगरसेविका विनिता कांबळे, तसेच जैन समाजाचे मान्यवर नेते, उद्योजक व व्यापारीवर्ग उपस्थित होते. यावेळी मोहन औसरमल यांनी आपले विचार मांडले. बाजारपेठेतून पालखी काढण्यात आली. यात जैन समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. पालखी मिरवणुकीच्या अग्रभागी बँड पथक होते. यावेळी पारंपरीक भजने विमलनाथ युवक भजनी मंडळाने सादर केली. कार्यक्र माचे आयोजन श्री विमलनाथ जैन नवयुवक भक्ती मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ओसवाल व समाजबांधवांनी केले होते.
रसायनीतील मिरवणुकीत आबालवद्धांचा सहभाग
रसायनी : भगवान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त मोहोपाडा येथील आदिनाथ जैन श्वेतांबर संघातर्फे भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक सवाद्य आदिनाथ जैन श्वेतांबर मंदिरापासून निघून बाजारपेठ, शिवाजी चौक, नाक्यावरून, नवीन पोसरीतून पुन्हा मंदिरात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने जैन महिला, मुले व पुरुष बांधव सहभागी झाले होते.महाडमध्ये महावीरांच्या
प्रतिमेची मिरवणूक
महाड : महाडमध्ये जैन बांधव संघटनेच्या वतीने महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ज्येष्ठ व्यापारी लादूलाल जैन, जैैन समााजाचे अध्यक्ष चंंदूलाल कोठारी, दिलीप जैैन, महावीर जैन, माजी नगरसेवक दिनेश जैन, निलेश ओसवाल, बाबूूूलाल जैन आदी सहभागी झाले होते.