माथेरानकर त्रस्त : मिनीबस सेवेचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 02:16 AM2018-01-26T02:16:49+5:302018-01-26T02:16:57+5:30
दहा वर्षांपूर्वी अनेक संघर्षानंतर कर्जत-माथेरान ही मिनीबस सेवा शासनाने सुरू केली खरी, पण आजही या मार्गावर दोन नवीन बसेस उपलब्ध असताना सुद्धा कर्जत आगाराच्या निष्काळजीपणामुळे या सेवेचा दिवसेंदिवस बोजवारा उडाला आहे.
माथेरान : दहा वर्षांपूर्वी अनेक संघर्षानंतर कर्जत-माथेरान ही मिनीबस सेवा शासनाने सुरू केली खरी, पण आजही या मार्गावर दोन नवीन बसेस उपलब्ध असताना सुद्धा कर्जत आगाराच्या निष्काळजीपणामुळे या सेवेचा दिवसेंदिवस बोजवारा उडाला आहे.
आॅक्टोबर २००८ मध्ये ही सेवा सुरू करताना स्थानिकांना नेहमीप्रमाणेच आपल्याच स्वत:च्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करावा लागला होता. या मार्गावर कर्जत आगाराला याच बससेवेच्या माध्यमातून भरीव उत्पन्न सुद्धा मिळत आहे. मागील वर्षी दोन नवीन बसेस कर्जत आगाराला देण्यात आलेल्या असताना यातील एक बस कर्जत-पनवेल अशा फेºया करीत आहे. त्यामुळे एकच बस कर्जत- माथेरान दरम्यान धावत असते. अनेकदा ही बस बंद पडत असल्याने याचा नाहक त्रास नियमितपणे कॉलेजला जाणाºया पासधारक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच रोज प्रवास करणाºया व्यापारी वर्गाला सोसावा लागत आहे. या बसेस केव्हाही वेळेवर येत नाहीत. त्यामुळे बसची वाट पहात प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत असल्याने मानसिक त्रास प्रवाशांना होत आहे. वेळप्रसंगी वाढीव रक्कम मोजून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
अनेकदा बस येणार आहे की नाही याबाबत कर्जत आगाराला फोनवरून विचारणा केल्यास फोन बंद असतो. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच नेरळ येथील खांडा येथे बस आणली जात नाही. बस नेरळ -कल्याण हायवेवर उभी केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांना नेरळ स्टेशन पासून एक ते दीड किलोमीटर पायपीट आपल्या सामानासह लहान मुलांना घेऊन करावी लागत आहे. माथेरानपासून दस्तुरीपर्यंतचे तीन किलोमीटर अंतर आणि नेरळ येथून सुद्धा बससाठी पायपीट यामध्ये वयोवृद्ध नागरिकांना अत्यंत जिकिरीचे बनलेले आहे. याकामी बस स्टॅण्ड हा नेरळ बस डेपो येथे केल्यास सर्वांनाच सोयीस्कर होणार आहे. शासन याकडे केव्हा गांभीर्याने बघणार असा संतप्त सवाल वयोवृद्ध नागरिक करीत आहेत.
एकच बस धावते
मागील वर्षी दोन नवीन बसेस कर्जत आगाराला देण्यात आलेल्या असताना यातील एक बस कर्जत-पनवेल अशा फेºया करीत आहे. त्यामुळे एकच बस कर्जत-माथेरान दरम्यान धावत असते.
या बसेस केव्हाही वेळेवर येत नाहीत. त्यामुळे बसची वाट पहात प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत असल्याने मानसिक त्रास प्रवाशांना होत आहे.