आठवडी बाजारात कोट्यवधी रु पयांची उलाढाल; १८व्या शतकातील संस्कृती तग धरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 05:07 AM2017-11-01T05:07:16+5:302017-11-01T05:07:42+5:30

आजच्या कार्पोरेट जगतामध्ये मॉल संस्कृतीला ठरावीक वर्गाकडून प्रचंड महत्त्व दिले जाते. या ठिकाणी मिळणाºया वस्तू या अव्वाच्यासव्वा दराने विकल्या जातात.

Millions of turnover turnover in the market; The 18th Century Culture survived | आठवडी बाजारात कोट्यवधी रु पयांची उलाढाल; १८व्या शतकातील संस्कृती तग धरून

आठवडी बाजारात कोट्यवधी रु पयांची उलाढाल; १८व्या शतकातील संस्कृती तग धरून

Next

- आविष्कार देसाई

अलिबाग : आजच्या कार्पोरेट जगतामध्ये मॉल संस्कृतीला ठरावीक वर्गाकडून प्रचंड महत्त्व दिले जाते. या ठिकाणी मिळणाºया वस्तू या अव्वाच्यासव्वा दराने विकल्या जातात. कोट्यवधी रुपयांच्या होणाºया उलाढालीत आजही १८व्या शतकातली आठवडी बाजार संस्कृती रायगड जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये तग धरून असल्याचे दिसून येते.
कार्तिकी एकादशीच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडी बाजार भरण्याला सुरुवात झाली. पावसाळ्यात बंद असणारा बाजार आता पुन्हा सुरू झाला आहे. आठवडी बाजारमध्ये गरिबांपासून मध्यमवर्गीयांसह उच्च मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे या आठवडी बाजारांची उलाढालही कोट्यवधी रुपयांच्या घरात गेली आहे. या बाजारात गृहोपयोगी सर्वच गोष्टी एकाच ठिकाणी मिळत असल्याने नागरिकांना आठवडी बाजार सोयीचा ठरत आहे. नारळी-पोकळीच्या बागा, समुद्रकिनाºयाबरोबरच रायगड जिल्ह्यात येणाºया पर्यटकांची पावलेही आठवडी बाजाराकडे वळत आहेत. १३३ वर्षांची प्राचीन आठवडी बाजार परंपरा सध्या पर्यटकांचेही लक्ष वेधून घेत आहे. १८८३मध्ये अलिबाग तालुक्यात अलिबाग, रेवदंडा, किहीम, पोयनाड, रामराज, आंबेपूर आणि नागाव, पेण तालुक्यात पेण व नागोठणे, माणगाव तालुक्यात माणगाव व निजामपूर, रोहा तालुक्यात रोहा व अष्टमी, महाड तालुक्यात महाडला आठवडी बाजार भरण्यास प्रारंभ झाला. ग्रामीण भागात गरजेपोटी सुरू झालेले ही आठवडा बाजार पद्धत तालुक्यांतील विक्रेत्यांकरिता महत्त्वाची बाजारपेठ ठरली आहे.
कपडे, कडधान्य, याशिवाय कांदे, बटाटे, घरगुती पद्धतीचे मसाले, पापड, लोणची, भांडी, पालेभाज्या, ओली-सुकी मच्छी यासह आठवडी बाजारात असलेल्या अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागासह शहरांतील नागरिक गर्दी करतात. सरकारी दप्तर नोंदीनुसार प्रारंभीच्या काळात पोयनाड बाजारात २०० विक्रे ते आणि सुमारे एक हजार खरेदीदार येत होते तर नागाव-हटाळे येथील आठवडी बाजारात प्रारंभीच्या काळात १५ विक्रे ते व १०० खरेदीदार येत असत.
१८८१ च्या सुमारास तत्कालीन मुरु ड-जंजिरा संस्थानातील म्हसळा व श्रीवर्धनला आठवडी बाजार भरत होता.
१८८२ मध्ये तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात गौळवाडी, कोंदिवडे, दहिवली, कडाव, नेरळ, कदंब, सुगवे, खालापूर व तुपगाव या नऊ ठिकाणी मोठा प्रमाणात आठवडी बाजार भरत होता.
काळाच्या ओघात जिल्ह्यातील काही बाजार बंद झाले तर काही ठिकाणी नव्याने आठवडी बाजार सुरू झाले आहेत. त्यामध्ये अलिबागजवळच्या वरसोली, सहाण आणि वायशेत या तीन आठवडी बाजारांचा समावेश आहे.

Web Title: Millions of turnover turnover in the market; The 18th Century Culture survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार