मुंबई-गोवा मार्गाचे केंद्राकडे हस्तांतरण! ठेकेदारांवर कडक कारवाईचे संकेत; कामाला उशीर होत असल्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 03:46 AM2017-10-08T03:46:11+5:302017-10-08T03:46:27+5:30
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. ठेकेदार बदलूनही काम पूर्ण होत नसल्याने, गृहनिर्माणमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. ठेकेदार बदलूनही काम पूर्ण होत नसल्याने, गृहनिर्माणमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महामार्गाचे काम तातडीने व्हावे, यासाठी या महामार्गाचे काम केंद्र सरकारने करावे, अशी शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा शनिवारी मेहता यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या सहा वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे.
सुरु वातीला हे काम सुप्रीम कंपनीकडे होते. त्यांनी ते काम निर्धारित वेळेत पूर्ण केले नाही. जे काम झाले आहे, त्याचा दर्जा निकृष्ट असल्याने मेहता यांनी संताप व्यक्त केला. सुप्रीम कंपनीकडून ते काम काढून नंतर जे. एम. म्हात्रे इन्फ्रा कंपनी यांना देण्यात आले. मात्र, त्यांच्याकडूनही काम रखडलेले आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महामार्गाच्या कामाबाबत लवकरच मंत्रालय स्तरावर एक बैठक घेण्यात येईल. त्या बैठकीमध्ये ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणे, कामाबाबत टाइम बॉउंड ठरवून घेणे, मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच मार्गी लागावे, यासाठी हे काम केंद्र सरकारकडे वर्ग करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येऊन तशी शिफारस करणार असल्याचे मेहता यांनी सांगितले.
पळस्पे ते इंदापूर आणि इंदापूर ते झाराप या दोन्ही टप्प्यांतील भूसंपादनाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. रुंदीकरणामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. हे टाळण्यासाठी लवकरात लवकर मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करावे लागणार असल्याचे मेहता यांनी सांगितले.
बैठकीतील
महत्त्वाचे विषय
अलिबाग तालुक्यातील अलिबाग-रेवस आणि अलिबाग-रेवदंडा येथे नवीन रस्त्याचे काम आठ दिवसांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. अलिबाग-रोहे या मार्गाच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्याने याही कामाला वेगाने सुरुवात होणार आहे.
- खराब रस्त्यांमुळे आरोग्यसेवेसाठी तप्तर असणाºया १०८ या रु ग्णवाहिकेला
रु ग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी दहा मिनिटांऐवजी अर्धा तास लागतो. संबंधित विभागाने यामध्ये तातडीने सुधारणा कराव्यात, असे आदेशही देण्यात आले.
- जिल्ह्यामध्ये जनधन योजनेंतर्गत २ लाख २० हजार ६२८ खाती उघडण्यात आली आहेत. अटल सुरक्षा योजनेचा लाभ १० हजार ३२८, पंतप्रधान जीवन ज्योती योजनेत १ लाख ३,४९२, मुद्रा बँक योजनेमार्फत १३ हजार ९७८ लाभार्थ्यांना १५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
- वीजप्रकल्पांसाठी आवश्यक कोळशाचा पुरवठा सुरु ळीत सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यात पडलेला विजेचा तुटवडा भरून काढण्यात येणार आहे. ही परिस्थिती दहा दिवसांत पूर्वपदावर येणार असल्याने जनतेची विजेच्या भारनियमनातून सुटका होईल.
विकास संवाद हा कार्यक्र म प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. भाजपाने केलेल्या विकासकामांचाच त्यामध्ये समावेश राहणार असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. जनतेच्या विकासासाठी भाजपाची जनतेशी असलेली बांधिलकी कायमच राहणार आहे.
- प्रकाश मेहता, पालकमंत्री