‘ओखी’ वादळाचा तडाखा, गोवा, गुजरात राज्यातील बोटी आश्रयाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:26 IST2017-12-06T01:25:46+5:302017-12-06T01:26:03+5:30
‘ओखी’ वादळाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी राज्यातील, तसेच इतर राज्यातील सुमारे चारशेपेक्षा जास्त होड्या सोमवारपासून आगरदांडा बंदरात आश्रयाला आल्या आहेत

‘ओखी’ वादळाचा तडाखा, गोवा, गुजरात राज्यातील बोटी आश्रयाला
आगरदांडा : ‘ओखी’ वादळाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी राज्यातील, तसेच इतर राज्यातील सुमारे चारशेपेक्षा जास्त होड्या सोमवारपासून आगरदांडा बंदरात आश्रयाला आल्या आहेत. सर्व खलाशांना सुरक्षितता प्रदान केली आहे. आगरदांडा बंदरात सर्वाधिक बोटी स्थिरावल्यामुळे समुद्रात जिकडेतिकडे बोटीच बोटी दिसत आहेत. आगरदांडा बंदरात राजपुरी बंदरातील ७० मोठ्या होड्या तर रेवस, बोडणी, उरण येथील करंजा, पालघर जिल्हा तसेच गोवा व गुजरात राज्यातील बोटी स्थिरावल्या आहेत.
‘ओखी’ वादळाची दक्षता घेण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होती. आगरदांडा बंदरात मच्छीमारांसाठी रुग्णवाहिका तसेच आरोग्यविषयक सुविधा तैनात ठेवण्यात आल्या होत्या. मच्छीमारांसाठी पाण्याची सोय, तसेच इतर अत्यावश्यक सेवा ठेवण्यात आल्या होत्या. महसूल खाते, वनखाते, मेरीटाइम बोर्ड, कोस्टल गार्ड, पोलीस, मत्स्यविकास अधिकारी आदी विभागातील सर्व अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. याबाबत अधिक माहिती देताना आरोग्य सहायक संतोष नागावकर यांनी खोल समुद्रातून मच्छीमार परतल्यावर ते खूप भयभीत झालेले असतात. अशा वेळी त्यांचे ब्लड प्रेशर चेक करून त्यांना आवश्यक असणारी आरोग्यविषयक सेवा दिली जात आहे. मंगळवारी जंजिरा किल्ला, तसेच दिघी आगरदांडा व अन्य वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सर्व जेटींवर प्रवासी वाहतूक बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. समुद्र किनाºयावर दोन मीटरच्या लाटा उसळत असल्याने खोरा बंदरात स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. या लाटांचे दृश्य अनेकांनी आपल्या मोबाइल कॅमेºयात कैद के ले.
दिघी खाडीत ६०० नौका आश्रयाला
१श्रीवर्धन : तालुक्यातील दिघी व भारडखोल गावातील मच्छीमारीसाठी गेलेल्या नौकांपैकी पाच नौका अरबी समुद्रात अचानक आल्या. त्या ‘ओखी’ वादळामध्ये भरकटल्या असल्याचे वृत्त समजताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाने श्रीवर्धन तहसीलदार जयराज सूर्यवंशी, दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके व मुरु ड कोस्ट गार्ड यांच्या मदतीने नौका शोधमोहीम सुरू केली. यातील दिघी गावातील चार मच्छीमार नौका सुखरूप दिघी खाडीत पोहचल्या आहेत, तर भरडखोल येथील एक नौका अद्याप न परतल्याने कुटुंब व ग्रामस्थ भयभीत झाले असून, नौकेचा शोध सुरू आहे. तर दिघी खाडीत अंदाजे ६०० नौका आश्रयाला आल्या आहेत.२अरबी समुद्रात अचानक ‘ओखी’ वादळाच्या संकटामुळे कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांची दाणादाण उडाल्याचे निदर्शनास आले. भरडखोल येथील जयलक्ष्मी नामीक मच्छीमार नौका क्र . आय एन पी एम एच३ एम एम ७०५ नारायण हरबा रघुवीर, धर्मा चांग गोवारी व इतर दोन खलाशी या नौकेत असल्याची माहिती श्रीवर्धन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी दिली. ३० नोव्हेंबर रोजी मच्छीमारीसाठी गेलेल्या नौका
चक्रि वादळामुळे समुद्रात भरकटल्या होत्या. चार नौका किनाºयाला आणण्यात यश आले असून, एका नौकेचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.३अचानक आलेल्या ‘ओखी’ वादळामुळे कोकण किनारपट्टीवरील भरकटलेल्या मच्छीमारांच्या नौका दिघी खाडीत आश्रयाला आल्या आहेत. कोकण किनारपट्टीवरील नावक, करंजा, बोडणी, अलिबाग, श्रीवर्धन, भरडखोल, उरण बोरा, दिघोडे या बंदरांवरील अंदाजे ६०० नौका दिघी खाडीत आश्रयाला आलेल्या आहेत. या नौकांमधील मच्छीमारांसाठी आपत्ती व्यवस्थापन व आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर या नौकांमधील मच्छीमारांना आहाराची व डिझेलची व्यवस्था शासनामार्फत करण्यात आली आहे.
रसायनीत ढगाळ वातावरण
लोकमत न्यूज नेटवर्क
रसायनी : रसायनीत ‘ओखी’ वादळामुळे सोमवारी सायंकाळी पावसाला सुरु वात झाली. मंगळवारी सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत मध्यम पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे लोकांची त्रेधातिरपीट उडाली. चक्रिवादळाच्या संभाव्य परिणामाबद्दल हवामान खात्याच्या इशाºयानुसार शासन आदेशाप्रमाणे मोहोपाडा-रसायनी परिसरातील शाळा मंगळवारी बंद होत्या. बँका नेहमीप्रमाणे चालू होत्या. मात्र, ग्राहकांची वर्दळ कमी होती. परिसरातील वीटभट्टी मालकांनी कच्च्या विटांवर प्लास्टिकच्या पट्ट्या अंथरल्या होत्या. परिसरात कोठेही नुकसानीचे वृत्त नसल्याचे पोलीससूत्रांनी सांगितले. मंगळवारी दुपारीही थंड हवा आणि ढगाळ हवामान राहिले.
काजू, आंब्याचा मोहर गळाला
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसळा : ‘ओखी’ वादळाचा तडाखा म्हसळा तालुक्यालाही बसला असून, अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांची तारांबळ उडाली. नुकताच मोहर आलेल्या आंबा व काजू कलमांना मात्र याचा जोरदार फटका बसल्याचे दिसून आले. त्यामुळे आंबा-काजू शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत होती. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने शेतक ºयांना नुकसानाला सामोरे जावे लागते. आंबा-काजू नुकसानासोबत तालुक्यात अनेक ठिकाणी आवरा, पावटा, तूर यांचेही पीक घेतले जाते, त्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त आहे. शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा शेतकºयांकडून करण्यात येत आहे. नुकत्याच सुरू झालेल्या वीटभट्टी व्यवसायावर या पावसाचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, वीटभट्ट्यांचेही नुकसान झाले आहे.