रिक्षा भाडेवाढीचा प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:39 AM2018-06-01T01:39:24+5:302018-06-01T01:39:24+5:30

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. जीवनाश्यक बाबींच्या दरातही वाढ होत असताना

Rickshaw festers hit the passengers | रिक्षा भाडेवाढीचा प्रवाशांना फटका

रिक्षा भाडेवाढीचा प्रवाशांना फटका

Next

अलिबाग : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. जीवनाश्यक बाबींच्या दरातही वाढ होत असताना आॅटो रिक्षा चालक-मालकांनी भाड्यामध्ये तब्बल १० ते १५ रु पयांनी वाढ केली आहे. त्याचा फटका प्रवाशांच्या खिशाला बसत आहे. तर आॅटो रिक्षामध्ये केलेली दरवाढ अधिकृत नसल्याचे स्पष्टीकरण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार यांनी केले आहे. त्यामुळे मनमानी पध्दतीने केलेली दरवाढ आॅटो रिक्षा चालक मागे घेतात की नाही, याकडे प्रवाशांचे लक्ष लागून आहे.
पेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या पंधरा दिवसात झालेल्या भरमसाट वाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांबरोबरच वाहन चालकांनाही बसला आहे. सरकारच्या विविध निर्णयामुळे जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. पेट्रोल, पासिंग व विम्याच्या वाढत्या दरामुळे रिक्षा चालकांना सध्याचे भाडे परवडण्यासारखे नसल्याने काही रिक्षा चालकांनी गेल्या दिवसांपासून रिक्षा भाड्यात वाढ केली आहे. दहा ते पंधरा रु पयांनी भाडे वाढले आहे.
सरकारने गेल्या पंधरा दिवसात भरमसाट पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. ७८ रुपयांवरून थेट ८५ रुपयांपर्यंत पेट्रोलचे दर वाढविण्यात आले आहेत, तर डिझेलचे दर ७३ रु पये प्रति लिटर झाले आहे. पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यात रिक्षा, मिनीडोर व्यावसायिकांचे हाल होत आहेत. एक लिटर पेट्रोलबरोबरच २० रुपयांचे आॅइलही त्यांना टाकावे लागते. त्यामुळे रिक्षा, मिनीडोरचा व्यवसाय करणेदेखील कठीण होऊन बसले आहे. पेट्रोलच्या वाढत्या दराबरोबरच रिक्षावरील विम्यामध्येही भरमसाट वाढ करण्यात आली आहे. ७०० रु पयांऐवजी १ हजार ४०० रु पये विम्यासाठी मोजण्याची वेळ रिक्षा चालक व मालकांवर आली आहे. तसेच रिक्षा पासिंगचा खर्चही आवाक्याबाहेर आहे. पूर्वी रिक्षा पासिंगसाठी साडेसहा हजार रु पये खर्च यायचा. आता साडेआठ हजार रु पये पासिंगचा खर्च येत असल्याचे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे. त्यात बँकेच्या कर्जाचा हप्ता अशा अनेक समस्यांमुळे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणे रिक्षा व मिनीडोर चालकांना कठीण झाले आहे.
सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे रिक्षा व मिनीडोर व्यावसायिकांवरही उपासमारीची वेळ येऊ लागली आहे. दहा ते पंधरा रुपयांनी वाढ केल्याचे रिक्षा व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे. रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहनही व्यावसायिकांकडून करण्यात आले आहे. रिक्षा चालक- मालकांनी सरकार अथवा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची कोणतीही परवानगी घेतलेली नसल्यामुळे त्यांनी केलेली भाववाढ अनधिकृत ठरत आहे.

सरकारने रिक्षाचे परमीट देताना कोणताच विचार केलेला नाही. मागेल त्याला परमीट दिल्याने ज्याची आर्थिक परिस्थितीत चांगली आहे त्यांनीही परमीट घेतले आहे. त्यामुळे रिक्षा व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
२०१२ पासून आम्ही दरवाढ केलेली नाही. त्यावेळी पेट्रोलचा दर ५४ रुपये होता. आता पेट्रोलचा दर ८५ रु पये आहे. प्रशासनाकडे दरवाढीबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु अद्यापही त्यावर विचार झालेला नाही. त्यामुळे आम्हाला दरवाढ करावी लागली आहे, असे अलिबाग आॅटो व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

आॅटो रिक्षाचे भाडे वाढवण्याबाबत कोणतीच सूचना अथवा आदेश प्राप्त झालेले नाहीत. आॅटो रिक्षा चालक-मालकांनी दर वाढवले असतील, तर त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाºयांशी चर्चा करण्यात येईल.
- ऊर्मिला पवार, उपप्रादेशिक
परिवहन अधिकारी

Web Title: Rickshaw festers hit the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.