साईबाबांची पायी पालखी निघाली शिर्डीला
By admin | Published: February 1, 2016 01:38 AM2016-02-01T01:38:56+5:302016-02-01T01:38:56+5:30
येथील साईप्रेमी श्री साई सेवा मंडळाने साईबाबांची पालखी घेऊन पायी शिर्डीला जाण्याचे आयोजन केले आहे. सुमारे दीडशे साईभक्त पायी पालखी घेऊन शिर्डीकडे निघाले तेव्हा
कर्जत : येथील साईप्रेमी श्री साई सेवा मंडळाने साईबाबांची पालखी घेऊन पायी शिर्डीला जाण्याचे आयोजन केले आहे. सुमारे दीडशे साईभक्त पायी पालखी घेऊन शिर्डीकडे निघाले तेव्हा त्यांना कर्जतच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी असंख्य भाविकांनी उपस्थित राहून साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी ढोल -ताशा पथकाने कर्जतकरांना अचंबित केले.
श्री दत्त मंदिरामध्ये साईबाबांची प्रतिमा पहाटेच दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. अनेक भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर सार्इंची प्रतिमा सजावट केलेल्या पालखीमध्ये ठेवण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष राजेश लाड व नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांच्या हस्ते पूजन केल्यानंतर पालखीची मिरवणूक कर्जत शहरातून वाजतगाजत काढण्यात आली. अध्यक्ष अरविंद झुंजारराव, संतोष तथा सटू दाभणे, पंकज शिंदे आदींच्या मार्गदर्शनाखाली शिर्र्डीकडे निघाली. याप्रसंगी महेंद्र चंदन, विठ्ठल जाधव, दिलीप आंबवणे, सुरेखा शितोळे आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्याच्या पाचव्या वर्षानिमित्त यंदा विशेष म्हणजे मी उरणकर या ढोल-ताशाच्या पथकाने कर्जतकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विशाल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस जण असलेल्या या पथकामध्ये दोन सात वर्षांच्या चिमुरड्यांनी भले मोठे ढोल वाजवून सर्वांनाच अचंबित केले. या पथकात २९ ढोल व ९ ताशांचा समावेश होता. (वार्ताहर)