शिवचरित्र हे अक्षय ऊर्जेचा स्रोत

By Admin | Published: February 21, 2017 06:08 AM2017-02-21T06:08:35+5:302017-02-21T06:08:35+5:30

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य तथा त्यागाचे प्रतीक होते. अस्मानी सुलतानी संकाटाशी निकराची झुंज देताना

Sivcharitra is the source of renewable energy | शिवचरित्र हे अक्षय ऊर्जेचा स्रोत

शिवचरित्र हे अक्षय ऊर्जेचा स्रोत

googlenewsNext

नांदगाव/ मुरूड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य तथा त्यागाचे प्रतीक होते. अस्मानी सुलतानी संकाटाशी निकराची झुंज देताना असंख्य मावळ्यांसह रयतेसाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे चरित्र समाजाला आजही अक्षय ऊर्जेचे स्रोत ठरत आहे, असे प्रतिपादन पुणे येथील इतिहास अभ्यासक डॉ. माधव पोतदार यांनी केले.
जंजिरा-मुरूड नगरपरिषद व शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित शिवचरित्रावर व्याख्यान देताना पोतदार बोलत होते. पोतदार म्हणाले की, शिवाजीची ओळख तलवार आणि अफझल खानाचा वध इतकी सिमित राहू नये. तर माता, मातृभूमी आणि मातृभाषा या मानदंड सगळ्याने विचार रयतेमध्ये रुजवून माणसं घडवली. स्वाभिमान जागवून परकीय शत्रूचे आक्र मण उलथून स्वराज्याची स्थापना केली. सुरतेची लूट पद्मदुर्ग व सिंधुदुर्ग उभारणीसाठी वापरून मोगल व इंग्रजांवर जरब बसवली. राष्ट्र ही संकल्पना शिवरायांनी आचरणात आणून गड-किल्ल्यांचे संवर्धन करीत युद्धशास्त्रातील नैपुण्य सिद्ध केले. शिवाजी हे व्यक्तिमत्त्व म्हणजे फक्त तलवार घेतलेला महापुरु ष नव्हे, तर परकीयांची सत्ता रोखून स्वअस्तित्वाचा झेंडा रोवणारे हे पहिले महाराष्ट्रीयन महापुरु ष होते. ज्याने विविध पगडीच्या लोकांना हाताशी घेऊन स्वराज्य मिळवण्यासाठी ज्योत प्रज्वलीत करून एक नवा अध्याय घडवला आहे. सुरतेची लूट ही किल्ल्याची डागडुजी व नवीन किल्ले बांधण्यासाठी त्याकाळात पैशांची आवश्यकता महाराजांना जाणवली म्हणूनच त्यांनी सुरतेची लूट करून गड-किल्ले बांधण्यावर जास्त भर दिला होता.
या वेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा स्नेहा पाटील, उपनगराध्यक्षा नौशिन दरोगे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, वक्तृत्व स्पर्धा समितीप्रमुख सुरेश उपाध्ये, नगरसेविका मुग्धा जोशी, पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, नगरसेविका युगा ठाकूर, नगरसेविका अनुजा दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त लक्ष्मीखार बापूजी देव मंदिरापासून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक शहरांतील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. पारंपरिक वाद्य खालू बाजे, तसेच सर एस. ए. विद्यालयाचे लेझीम पथक व मजगाव येथील कसरतपटूंनी आवेशपूर्ण कवायती, दांडपट्टा आदींची प्रात्यक्षिके करून दुतर्फा गोळा झालेल्या नागरिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली जोशी, दीपाली रोटकर यांनी तर आभार प्रदर्शन दयानंद गोरे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Sivcharitra is the source of renewable energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.