अनधिकृत वाळू उत्खनन रोखून, वाळू माफियांना पायबंद घालण्यासाठी कडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 21:18 IST2018-01-20T21:18:33+5:302018-01-20T21:18:46+5:30
जिल्ह्यात वाळूचे अनधिकृत उत्खनन रोखून वाळू माफियांना पायबंद बसावा यासाठी महसूल प्रशासन कडक कारवाई करीत आहे.

अनधिकृत वाळू उत्खनन रोखून, वाळू माफियांना पायबंद घालण्यासाठी कडक कारवाई
रायगड - जिल्ह्यात वाळूचे अनधिकृत उत्खनन रोखून वाळू माफियांना पायबंद बसावा यासाठी महसूल प्रशासन कडक कारवाई करीत आहे. त्यासाठी मेरिटाईम बोर्ड, पोलीस, परिवहन विभाग आणि वन विभाग हे महसूल विभागासोबत या कारवाईत सहभागी होतील, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी शनिवारी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलताना दिले आहेत.
बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी भारत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, अलिबाग उप वनसंरक्षक मनिष कुमार, प्रांतांधिकारी, तहसिलदार, पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पकडलेले सक्शन पंप व बोटी नष्ट करण्याचे आदेश
जिल्हा प्रशासनाने आता पर्यंत 13 कोटीं रुपयांचा वाळू लिलाव केला आहे. उर्वरित वाळूचा लिलाव करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये अनधिकृत वाळू उत्खनन होणार नाही याकरीता जिल्हा प्रशासन दक्षता घेत आहे. अनधिकृत वाळू उत्खनन करण्यार्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. पकडलेले सक्शन पंप व बोटी नष्ट करण्यात येतील. ज्या बोटींवर नंबर नाहीत अशा बोटींवर कारवाई करण्यात येईल.या कारवाईसाठी मेरीटाईम बोर्डाकडून 10 ते 12 जणांचा गट तयार करु न नावाडी उपलब्ध करु न देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी यावेळी दिल्या.