महामार्गावर रसायनाच्या वासाने त्रास, मुंबई - गोवा महामार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 07:06 AM2017-11-28T07:06:40+5:302017-11-28T07:06:45+5:30

मुंबई - गोवा महामार्गावर शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास महाड तालुका हद्दीत रसायनाच्या दुर्गंधीने नागरिक हैराण झाले. महामार्गावरून जाणारी-येणारी वाहने, पादचारी तसेच महामार्गालगत असणा-या अनेक गावांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा

 Troubles with the smell of chemicals on the highway, Mumbai - Goa highway incident | महामार्गावर रसायनाच्या वासाने त्रास, मुंबई - गोवा महामार्गावरील घटना

महामार्गावर रसायनाच्या वासाने त्रास, मुंबई - गोवा महामार्गावरील घटना

Next

- सिकंदर अनवारे
दासगाव : मुंबई - गोवा महामार्गावर शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास महाड तालुका हद्दीत रसायनाच्या दुर्गंधीने नागरिक हैराण झाले. महामार्गावरून जाणारी-येणारी वाहने, पादचारी तसेच महामार्गालगत असणा-या अनेक गावांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला. मात्र, या रसायनाच्या वासामुळे डोके जड होणे, उलटी होणे, चक्कर येणे अशा अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागले. जवळपास अर्धा तास कोणाच्याही लक्षात आले नाही, हा वास कोठून येतो. मात्र, शोधानंतर महामार्गावरून जाणाºया रसायनाच्या टँकरमधून गळती झालेल्या महामार्गावरच्या रसायनाचा वास असल्याचे निदर्शनास आले. हा टँकर पाण्यासारखे असलेले रसायन मुंबईच्या दिशेने महामार्गावरून सोडत गेला होता. नेहमीच गळती होणाºया रसायनाच्या टँकरवर अद्याप महामार्ग वाहतूक पोलीस, तसेच आरटीओकडून एकही कारवाई केली नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
महाड औद्योगिक वसाहत, तसेच लोटे औद्योगिक वसाहतीमधून घातक रसायनयुक्त सांडपाणी अनेक गॅसेस तसेच अ‍ॅसिड भरलेले टँकर अनेक घातक रसायन महामार्गावरून वाहतूक करीत असतात. नादुरुस्त टँकर तसेच जाणूनबुजून सोडण्यात येणारे महामार्गावर रसायनयुक्त सांडपाणी याचा मात्र फटका महामार्गालगत असणाºया गावांना, तसेच पादचारी व या मार्गावरून जाणाºया वाहनांना तसेच प्रवाशांना नेहमीच सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी या औद्योगिक वसाहतीमधून मोठ्या प्रमाणात टँकर बाहेर पडून रात्रीचा फायदा घेत हे टँकर चालक हे उद्योग करत असल्याची चर्चा सुरू आहे.
शनिवारी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक महाड तालुका परिरातील गंधारपाले, साहीलनगर, केंबुर्ली, वहूर, दासगाव, वीर, महामार्गालगत असलेल्या या गावांना मोठ्या प्रमाणात रसायनाच्या दुर्गंधीचा त्रास सुरू झाला व महामार्गावरून जाणारे प्रवासी, पादचारी व या गावातील नागरिकांना उलटी होणे, डोके जड होणे, चक्कर येणे, अशा समस्यांना सामोरे जावे लागले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अर्ध्या तासानंतर येणाºया दुर्गंधीचा नागरिकांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता महामार्ग ओला झाला होता. एखाद्या टँकरमधून रसायनाची गळती झाल्याचे दिसून आले आणि याचा वास असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर अनेकांनी दोन्ही दिशेला या सोडलेल्या रसायनाच्या टँकरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र सापडला नाही. केमिकलचा त्रास मात्र अर्धा तास जाणवत होता. शनिवारी झालेल्या या घटनेप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गावर किंवा महामार्गालगत रसायन सोडण्याचे उद्योग सुरू आहेत. याचा फटका मात्र नेहमीच महामार्गालगत असलेल्या गावांना सहन करावा लागत आहे. रात्री १२ नंतर मुंबई-गोवा महामार्गावर रसायनाच्या दुर्गंधीचे प्रमाण वाढत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अशावेळी आरटीओ किंवा वाहतूक शाखा पोलिसांनी या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत नाही. शनिवारी झालेल्या रसायन गळतीचा नागरिकांना फटका सहन करावा लागला आहे.

सध्या महामार्ग वाहतूक पोलीस शाखेच्या ठिकाणी वरिष्ठांकडून देण्यात आलेल्या दंडात्मक पावत्यांचा टप्पा पूर्ण करण्याच्याशिवाय इतर कोणतेच काम करत नाही. वरिष्ठांकडून देण्यात आलेला दिवसभराच्या पावत्यांचा टप्पा पूर्ण झालाय की नंतर रसायन गळती असो, इतर वाहन संशयास्पद असो कोणत्याही वाहनाची तपासणी केली जात नाही.
महामार्गावर पोलीस दिसतच नाहीत, त्यामुळे चिपळूण किंवा महाड औद्योगिक वसाहतीमधून मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला होणारी घातक रसायनांची वाहतूक करणाºया टँकर चालकांचे फावत असून ते सर्रास मोठ्या प्रमाणात रस्त्याने रसायन सांडत नेतात. मात्र वरिष्ठांनी दिलेले आदेश पाळत नागरिकांना होणाºया त्रासाकडे महामार्ग पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मोठ्या प्रमाणात
रात्रीची वाहतूक
मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात टँकरद्वारे घातक रासायनिक सांडपाणी तसेच क ारखान्यातून निघणाºया रसायनाची वाहतूक रात्रीच्या वेळी करण्यात येत आहे. रात्रीचा फायदा घेत टँकरचालक एखाद्या रस्त्याकडेच्या नाल्यात पाणी सोडण्याचे उद्योग करत असतात.
नाहीतर व्हॉल्व उघडा करून संपूर्ण महामार्गावर रसायन सांडत टँकरखाली करत जातात. अशा वाहनांवर, टँकरवर आजपर्यंत कोणतीही कारवाई आरटीओ अगर महामार्ग पोलिसांकडून करण्यात आलेली नाही.
मात्र महामार्गावर सुटणाºया या केमिकलचा त्रास नेहमीच या मार्गावरील असणाºया गावांना सहन करावा लागत आहे.

महामार्ग वाहतूक शाखा पोलीस महामार्गावरील अपघात आणि वाहतुकीला होणारे अडथळे दूर करीत असतात. रात्रीच्या वेळी टँकरमधून रसायन सोडले जात असेल तर माहिती पडत नाही. कारण रात्रीच्या वेळी महामार्ग पोलीस एखादा अपघात झाल्यासच बाहेर पडतात.
- सचिन गवळी, पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, वाकण
शनिवारी महामार्गावर सांडणाºया केमिकलद्वारे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. यामुळे याचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागला. पोलीस प्रशासनाने यावर निर्बंध घातला नाही तर रस्त्यावर उतरून एकही रसायन वाहतूक करणारा टँकर या मार्गी जाऊ देणार नाही.
- इक्बाल म्हैसकर,
तंटामुक्त अध्यक्ष दासगाव

Web Title:  Troubles with the smell of chemicals on the highway, Mumbai - Goa highway incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड