LokSabha2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात ५ वाजेपर्यंत ५३.७५ टक्के मतदान

By शोभना कांबळे | Published: May 7, 2024 06:06 PM2024-05-07T18:06:00+5:302024-05-07T18:07:14+5:30

सावंतवाडी विधानसभा मतदार संघाने ‘साठी’ ओलांडली

53.75 percent polling till 5 pm in Ratnagiri-Sindhudurg constituency | LokSabha2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात ५ वाजेपर्यंत ५३.७५ टक्के मतदान

LokSabha2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात ५ वाजेपर्यंत ५३.७५ टक्के मतदान

रत्नागिरी - लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मंगळवारी  सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.७५ टक्के मतदान झाले आहे. या मतदार संघात सर्वाधिक मतदान सावंतवाडी विधानसभा मतदार संघात ६०.३० टक्के आणि सर्वात कमी राजापूर विधानसभा मतदार संघात ४७.३१ टक्के मतदान झाले. यावेळी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची अंतिम वेळ आहे. 

सकाळी ७ ते ११ या वेळेत चिपळूण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले होते. तर रत्नागिरी विधानसभा मतदार संघात सर्वात कमी मतदान झाले आहे. प्रशासनाकडून सायंकाळी ५ वाजता आलेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार, चिपळूण मतदार संघात ५२.६२ टक्के मतदान झाले आहे. 

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात ४९.८३ टक्के मतदान झाले आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात ४७.३१ टक्के मतदान झाले आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात ५५.१४ टक्के मतदान झाले आहे. कुडाळ मतदारसंघात ५९.०९ टक्के आणि सावंतवाडी मतदार संघात सर्वाधिक ६०.३ टक्के मतदान झाले आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. त्यामुळे तासाभरात आणखी मतदानाचा टक्का वाढणार आहे.

Web Title: 53.75 percent polling till 5 pm in Ratnagiri-Sindhudurg constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.