कोमसाप पुरस्कार प्रदान सोहळा
By admin | Published: February 24, 2015 09:50 PM2015-02-24T21:50:38+5:302015-02-25T00:14:28+5:30
प्रभाकर नाईक : जन्मभूमीतील सत्कार आयुष्य घडविणारा ठरेल
खालगाव : कोकणच्या लाल मातीतील, नारळाच्या सावलीतील व आंब्याच्या वासातील कविवर्य केशवसुतांच्या जन्मभूमीतील कोकण कलाभूषण सन्मान हा माझ्या आयुष्यातील पहिला आणि कदाचित शेवटचा गौरव आहे, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय टॅपेस्ट्री कलावंत प्रभाकर नाईक-साटम यांनी कवी केशवसूत स्मारक, मालगुंड येथे कोमसापने केलेल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.कोमसापतर्फे कोकणातील लोकप्रतिनिधींचा नाईक साटम यांचाही सत्कार झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कोकण कला अकादमीचे अध्यक्ष शिक्षक आमदार संजय केळकर होते. व्यासपीठावर कोमसापचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक, अध्यक्ष डॉ. महेश केळूसकर, सरपंच साधना साळवी, सभापती प्रकाश साळवी, विश्वस्त अरुण नेरुरकर, गजानन पाटील, अण्णा राजवाडकर, शिरीष उकिडवे, नलिनी खेर, प्रकाश आवटी, प्रशांत परांजपे, आर. एम. पाटील, एल. बी. पाटील, रेखा नार्वेकर, उषा परब, कवयित्री शोभा जोशी, स्वप्नगंधा कुलकर्णी, अचला जोशी मान्यवर कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी पुरोगामी नेते गोविंदराव पानसरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक गजानन पाटील यांनी केले. स्वागत नलिनी खेर यांनी केले. कोमसापची भूमिका अध्यक्ष केळुसकर यांनी मांडली. पुरस्कार विजेते प्रभाकर नाईक साटम, अजला जोशी, अध्यक्ष संजय केळकर यांची भाषणे झाली. प्रशांत परांजपे, गजानन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)