महामार्गासाठी एक इंचही जागा न देण्याचा गुहागर ग्रामस्थांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 04:16 PM2017-08-24T16:16:25+5:302017-08-24T16:16:29+5:30
चिपळूण : गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी एकही इंच जागा न देण्याचा निर्धार मिरजोळी गुहागर येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. मिरजोळी ते गुहागरपर्यंतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांची राष्ट्रीय महामार्गाबाबत माजी सभापती जितेंद्र चव्हाण यांनी रामपूर येथील केदारनाथ मंदिरात विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्धार केला.

मिरजोळी ते गुहागरपर्यंतचे व्यापारी, लघु उद्योजक, जमीनधारक व ४०० जणांचा समुदाय उपस्थित होता. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम प्रमुख मार्गदर्शक होते. गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाल्याचे समजते. परंतु, ग्रामपंचायत, दुकानदार, व्यापारी, जमीनमालक यांना शासनाकडून कळवलेले नाही, असे चव्हाण यांनी सांगितले. आमसभेत प्रश्न उपस्थित केला असता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाºयांनी काहीच माहिती दिली नाही.
कामासाठी ठेकेदार नियुक्त केला आहे. पाचाड, मालघर, मिरजोळी, रामपूर, मार्गताम्हाणे, चिखली, शृंगारतळी, गुहागर बाजारपेठ उद्ध्वस्त होणार आहे. सामान्य खोकेधारक, व्यापाºयांचे संसार उद्ध्वस्त होऊन उपासमारीची वेळ येईल. सर्वांनी एकत्र येऊन भविष्याचा विचार केला पाहिजे, असे सांगण्यात आले.
रस्त्याचे टेंडर निघाले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे बांधायची झाल्यास राष्ट्रीय महामार्ग बांधकाम खात्याचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. प्रकल्पाआधी ८० टक्के जमीनमालकांना मोबदला दिला पाहिजे, असे परिपत्रक आहे.
कोल्हापूर येथे विभागीय कार्यालय आहे. लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, सरपंच यांना विश्वासात घेतले नाही. यादरम्यान १९ ग्रामपंचायती आहेत. कायदेशीर मार्गाने लढा द्या, असे आवाहनही केले. सर्वांनी गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी एक इंचही जागा न देण्याचा निर्धार केला.