Holi 2018 रत्नागिरी : शिमगोत्सव साजरा, श्री देवी करंजेश्वरीने शोधून काढली ४० शेरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 07:50 PM2018-03-03T19:50:39+5:302018-03-03T19:50:39+5:30
कोकणातील शिमगोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेगवेगळ्या ठिकाणी प्रथा, परंपरा जपत शिमगोत्सव साजरा केला जातो. शहरातील गोवळकोट येथील श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव शेरणे शोधण्याच्या कार्यक्रमामुळे प्रसिध्द आहे. गुरुवारी शेरणेचा कार्यक्रम झाला व करंजेश्वरी देवीने ८० पैकी ४० शेरणे शोधून काढली.
चिपळूण : कोकणातील शिमगोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेगवेगळ्या ठिकाणी प्रथा, परंपरा जपत शिमगोत्सव साजरा केला जातो. शहरातील गोवळकोट येथील श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव शेरणे शोधण्याच्या कार्यक्रमामुळे प्रसिध्द आहे. गुरुवारी शेरणेचा कार्यक्रम झाला व करंजेश्वरी देवीने ८० पैकी ४० शेरणे शोधून काढली.
पेठमाप येथे शेरणे कार्यक्रम झाला. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. करंजेश्वरीचा शिमगोत्सव शेरणे कार्यक्रमासाठी प्रसिध्द आहे. आपली इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी पेठमाप येथे आपली मागणी एका कागदावर लिहून व ती कपड्यात गुंडाळून लपवून ठेवतात. श्री देवी करंजेश्वरीची पालखी ही शेरणी शोधून काढते.
चिपळुणातील करंजेश्वरीने शेरणे शोधले की, आपली मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रध्दा आहे. शेरणे काढण्याच्या कार्यक्रमामुळे गुरुवारी पेठमाप परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.