देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराची मतं डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 01:31 PM2018-04-07T13:31:15+5:302018-04-07T13:31:15+5:30

देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारांनी लढत देण्याचे निश्चित केल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे.

Independent candidate's vote in Deorukh Nagar Panchayat elections is frustrating | देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराची मतं डोकेदुखी

देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराची मतं डोकेदुखी

Next

देवरुख : देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारांनी लढत देण्याचे निश्चित केल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार अनघा कांगणे यांना मिळणारी मते ही अन्य उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. 

नगराध्यक्ष पदासाठी भाजप - मनसे - आरपीआय महायुतीकडून मृणाल शेट्ये उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादी - काँग्रेस  - जनता दल - बहुजन विकास आघाडी - कुणबी सेना या महाआघाडीकडून विद्यमान नगरसेविका स्मिता लाड या नगराध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार आहेत. शिवसेनेकडून धनश्री बोरूकर व स्वाभिमान पक्षाकडून विद्यमान नगरसेविका मिताली तळेकर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.   

या चारही उमेदवारांसह अपक्ष उमेदवार म्हणून अनघा कांगणे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे कांगणे यांनी या निवडणुकीतील रंगत वाढवली आहे. शहरात सर्वच पक्षांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. यामध्ये अपक्ष उमेदवार कांगणे यांनीही आपला विकासात्मक जाहीरनामा शहरातील मतदारांसमोर मांडला आहे. कुणबी बांधवांनी अनघा कांगणे यांना उमेदवारी देत जोरदार पाठिंबा दर्शविला आहे. 

देवरूख नगरपंचायत कार्यक्षेत्रात कुणबी समाज मोठ्या प्रमाणात वसलेला आहे. या समाजानेच अनघा कांगणे यांना उमेदवारी दिल्यामुळे तसेच हा समाज एकसंघ राहिल्यास कांगणे या निर्णायक मते मिळवू शकतात. तर दुसरीकडे स्मिता लाड, मृणाल शेट्ये, धनश्री बोरूकर व मिताली तळेकर या उमेदवारांनीही विजयाचा दावा केला आहे.  प्रत्येक पक्षाने आपल्या मतांची ताकद यापूर्वीच्या निवडणुकांमधून आजमावलेली आहे. यात स्वाभिमान पक्षच पहिल्यांदा लढत आहे. यामुळे त्यांचे मतांचे बळ सद्यस्थितीत अस्पष्ट आहे. त्यातच अपक्ष उमेदवार अनघा कांगणे या किती मते घेतील, हे देखील सध्या गुलदस्त्यातच आहे. दरम्यान,  कांगणे जी मते पदरात पाडतील, ती मते ही अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या गोटातीलच असणार आहेत. 
 

Web Title: Independent candidate's vote in Deorukh Nagar Panchayat elections is frustrating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.