रत्नागिरी जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार करणार : निलेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 05:16 PM2018-10-06T17:16:11+5:302018-10-06T17:44:32+5:30
शिवरायासमोर आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे, काही झालं तरी शिवसेना नको, कोणीही चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार इथे टिकता कामा नये. जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करणारच, असे मत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी : मागील काही घडामोडीमध्ये एकटा नीलेश राणे विरूद्ध अख्खी शिवसेना असे चित्र होते. मात्र, शिवसेना माझे काहीही करू शकले नाही. इतिहासामध्ये कधीही रत्नागिरीची शाखा चार दिवस बंद नव्हती, ती आपण बंद पाडली. आगामी लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना घरी पाठवणारच, अशी शपथ आपण घेतली आहे.
शिवरायासमोर आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे, काही झालं तरी शिवसेना नको, कोणीही चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार इथे टिकता कामा नये. जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करणारच, असे मत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी व्यक्त केले.
दक्षिण रत्नागिरीतील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांच्याहस्ते शनिवारी रत्नागिरीत करण्यात आला.
यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. या कार्यक्रमाला दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मेघना शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन माजळकर, जिल्हा सरचिटणीस मुन्ना खामकर, प्रवक्ते नित्यानंद दळवी, शहर अध्यक्ष अशोक वाडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
वाळू चोर तो वाळू चोरच राहणार.... ह्यांनी विरोधकांचीच भांडी घासली आणि स्वकीयांचा घात केला. मला काळात नाही पवार साहेबांवर अनेक वेळा शस्त्रक्रिया झाल्या पण त्यांनी कधी आराम केला नाही आणि हा फक्त फुटेज खाण्यासाठी बराच होत नाही आहे. pic.twitter.com/wiescH9nUI
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 3, 2018
निलेश राणे म्हणाले की, आपण आता काँग्रेस पक्षात नाही. या पक्षात आपण सर्वच गार झाला होतो. गंज धरली होती. आता संधी दिली मिळाली आहे, पक्षाची वेगळी ओळख निर्माण झाली. प्रत्येक बुथवर आपली लोक राहिली पाहिजेत. निवडणूक ही वेगळे रसायन आहे. प्रत्येक घरामागे कार्यकर्ते ठेवले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आज शिवसेनेत ज्याच्याकडे पैसा आहे तो सरस ठरत आहे. जुन्या शिवसैनिकांना काही दिले जात नाही. उदय सामंत शिवसैनिक झाले. पैशाच्या जीवावर पदे मिळवायची. अशाने जिल्हा पुढे कसा जाणार. राजन साळवी जुना शिवसैनिक. मात्र, त्याला काहीच नाही. जुन्या शिवसैनिकांमध्ये वेगळी रग आहे. ते दिसले की, त्यांना भेटावेसे वाटते, असे ते म्हणाले.
उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल
शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलयं की, बाईमाणसाची अब्रु म्हणजे आपल्या आईसारखी असते. ती कोणीही असली तरी आपल्या आई-बहीण समान असते. आणि तुमची रासलिला सुरू आहे. अस नाही सोडणार. प्रत्येक प्रकरण बाहेर काढणार. निलेश राणेकडे आयुष्यातील हे सहा महिने आहेत, या सहा महिन्यात या सर्वांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही. अब्रुनुकसानीचा दावा ठोक नीलेश राणेवर असा हल्लाबोल त्यांनी म्हाडा अध्यक्ष आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्यावर केला.
लंगडा भास्कर आणि वाकडा राऊत अजून 2014 च्याच स्वप्नात आहेत. आता वेळ बदललेला आहे आणि निकाल सुद्धा बदललेला असेल 2019 मध्ये. https://t.co/jTo2z5LLiz
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 2, 2018
भास्कर जाधवही निशाण्यावर
शरद पवारासारख्या ७५ वषार्तील माणूस सहा दिवसात बरा होतो. भास्कर जाधव बराच होत नाही. तीन महिने झाले, प्रत्येकाला दाखवतोय बघा माझा पाय. स्वत:च राजकीय कौतुक किती करून घ्यायचं. ज्या बाळासाहेबांच्या विरोधात भास्कर जाधव बोलले त्यांचेच पाय धरण्यासाठी विनायक राऊत त्याठिकाणी जातो. हे केवळ राणे नकोच यासाठीच असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.
जो भास्कर शिवसेना सोडताना बाळासाहेबांना वाटेल ते बोलला त्याच लंगड्या भास्करचे पाय राऊत ने चाटले. https://t.co/jTo2z5LLiz
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 2, 2018