रत्नागिरी : गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 04:03 PM2018-03-24T16:03:30+5:302018-03-24T16:12:56+5:30

गुहागर शहरामध्ये शिवसेनेचे फार मोठे अस्तित्व नाही. तरीही नगरपंचायत निवडणुकीमध्ये ही मते निर्णायक ठरणार आहेत. शिवसेनेने वॉर्ड १ व वॉर्ड ६ मधील उमेदवारांचे जातवैधता प्रमाणपत्र न दिल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे उर्वरीत उमेदवारांमध्ये शिवसेनेचे भवितव्य काय? याचीच चर्चा सध्या शहरात होत आहे.

Ratnagiri: The fight for existence for the Shiv Sena in the Guhagar Municipal Panchayat elections | रत्नागिरी : गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई

रत्नागिरी : गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई

googlenewsNext
ठळक मुद्देगुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकशिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई

संकेत गोयथळे

गुहागर : गुहागर शहरामध्ये शिवसेनेचे फार मोठे अस्तित्व नाही. तरीही नगरपंचायत निवडणुकीमध्ये ही मते निर्णायक ठरणार आहेत. शिवसेनेने वॉर्ड १ व वॉर्ड ६ मधील उमेदवारांचे जातवैधता प्रमाणपत्र न दिल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे उर्वरीत उमेदवारांमध्ये शिवसेनेचे भवितव्य काय? याचीच चर्चा सध्या शहरात होत आहे.

भाजप - शिवसेनेने युतीच्या माध्यमातून गुहागर ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले होते. नरेश शेटे यांच्यानंतर विनायक बारटक्के व अन्य पदाधिकारी यावेळी क्रियाशील होते. यातूनच उपसरपंचपदी रजनीनाथ वराडकर यांची निवड झाली होती. त्यानंतर मात्र गेल्या दहा वर्षात शहरामध्ये शिवसेनेला चांगली पकड मिळवता आलेली नाही. विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालिन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.

यावेळी शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व दिसून आले. त्यानंतर मागील नगरपंचायत निवडणुकीत तत्कालिन राज्यमंत्री व पालकमंत्री म्हणून भास्कर जाधव यांचा झंझावात असताना तत्कालिन जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण व कार्यकर्त्यांनी बिनधास्तपणे टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, याला फारसे यश आले नाही. कारण नरेश शेटे यांच्यानंतर शिवसेनेला तालुक्यात खंबीर नेतृत्वच लाभले नव्हते. मागील नगरपंचायत निवडणुकीचा विचार करता, शिवसेनेची शहरात २५० ते ३०० मते आहेत.

आजघडीला थोड्याफार प्रमाणात शिवसेना वाढलेली दिसते. कारण जिल्हाप्रमुख सचिन कदम हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून, त्यादृष्टीने मोर्चेबांधणी करीत आहेत. यातूनच शृंगारतळी येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाबरोबरच तालुक्यात ते कार्यकर्त्यांची मोट बांधत आहेत.

गुहागर शहरातही गेले वर्षभर शिवसेनेमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मुंबई संपर्कप्रमुख संतोष गोयथळे, नीलेश मोरे, राकेश साखरकर, सूरज सुर्वे यासारख्या युवा कार्यकर्त्यांची नवी फळी क्रियाशील आहे. यातूनच गुहागर तालुक्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर व्यावसायिक कबड्डी स्पर्धा घेण्यात आली.

गुहागर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने पाच जागांवर उमेदवार दिले आहेत. यामध्ये वॉर्ड क्रमांक १ मधील प्राची दिनेश आचरेकर व वॉर्ड क्रमांक ६ मधील विलास वाघधरे यांचे अर्ज बाद झाल्याने आजघडीला सेनेचे केवळ तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये वॉर्ड क्रमांक २ मधून राकेश साखरकर, वॉर्ड क्रमांक १२ मधून रश्मी भावे व वॉर्ड क्रमांक १६ मधून संतोष जनार्दन गोयथळे यांचा समावेश आहे.

अद्याप शिवसेना ही गुहागर शहर विकास आघाडीसोबत असल्याची घोषणा दोन्ही बाजूने करण्यात आलेली नाही. मात्र, असे असले तरी त्यांच्यात अंतर्गत चर्चा सुरु असल्याचे सांगितले जात आहे. वॉर्ड क्रमांक २ मधून राकेश साखरकर यांच्याविरोधात भाजपचे उमेश भोसले व राष्ट्रवादीच्या स्वाती संदेश कचरेकर निवडणूक लढवत आहेत तर वॉर्ड क्रमांक १२ मध्ये रश्मी भावे यांच्यासमोर भाजपच्या भाग्यलक्ष्मी कानडे व राष्ट्रवादीच्या रुपा अजय खातू यांचे आव्हान आहे.

सध्याचे शहरातील राजकारण पाहता, नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसत आहे. गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भास्कर जाधव यांचा पुन्हा करिष्मा राहणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे. गुहागरात शिवसेनेला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी पराकाष्ठा करावी लागणार आहे, त्याचबरोबर भाजपला पुन्हा एकदा आपली ताकद दाखवावी लागणार आहे.

शिवसेना, आघाडीच्या बोलण्यात कोण टार्गेट

वॉर्ड क्रमांक १६ मधून गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यातून गुहागर शहरात व विशेष करुन खालचापाट भागात कार्यरत असणारे शिवसेनेचे मुंबई संपर्कप्रमुख संतोष गोयथळे यांनीही आपल्या वॉर्डमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संतोष गोयथळे यांच्या उमेदवारीमुळे शिवसेना व गुहागर शहर विकास आघाडीची बोलणी फिस्कटतात की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.

सध्या निवडणूक रिंगणात असलेले संतोष गोयथळे हे शिवसेनेमधील एकमेव मोठे नाव प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात असल्याने शिवसेनेसाठी ही जमेची बाजू आहे. मात्र, शिवसेना व आघाडीच्या बोलण्यांमध्ये संतोष गोयथळे यांनाच ह्यटार्गेटह्ण केले जात आहे.

Web Title: Ratnagiri: The fight for existence for the Shiv Sena in the Guhagar Municipal Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.