रत्नागिरी :कोटीची उड्डाणे घेणाऱ्या चिपळूणच्या सुरेखा खेराडे, शहराला स्मार्ट सिटी करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 04:37 PM2018-03-08T16:37:47+5:302018-03-08T16:41:33+5:30

चिपळूण ही कोकणची सांस्कृतिक राजधानी आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या व तळ्यांचे शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या या शहरात ऐतिहासिक अशी बाजारपेठ आहे. देशाच्या विविध भागातून येथे पर्यटक येत असतात. कोकणातील एक महत्त्वाचे शहर म्हणून या शहराकडे पाहिले जाते. या शहराला स्मार्ट सिटी करण्याचा प्रयत्न नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी सुरु केला आहे.

Ratnagiri: Surekha Kherade, Chiplun, who owns the crores, is trying to make the city smart | रत्नागिरी :कोटीची उड्डाणे घेणाऱ्या चिपळूणच्या सुरेखा खेराडे, शहराला स्मार्ट सिटी करण्याचा प्रयत्न

रत्नागिरी :कोटीची उड्डाणे घेणाऱ्या चिपळूणच्या सुरेखा खेराडे, शहराला स्मार्ट सिटी करण्याचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देचिपळूण शहर स्वच्छ-सुंदर करण्याबरोबरच शहरविकासाकडे विशेष लक्ष स्मार्ट सिटी करण्याचा नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांचा प्रयत्न सुरु

सुभाष कदम

चिपळूण : चिपळूण ही कोकणची सांस्कृतिक राजधानी आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या व तळ्यांचे शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या या शहरात ऐतिहासिक अशी बाजारपेठ आहे. देशाच्या विविध भागातून येथे पर्यटक येत असतात. कोकणातील एक महत्त्वाचे शहर म्हणून या शहराकडे पाहिले जाते. या शहराला स्मार्ट सिटी करण्याचा प्रयत्न नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी सुरु केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यात व देशात असणाऱ्या सत्तेचा पुरेपूर उपयोग शहरासाठी करण्याचा त्यांचा इरादा आहे. त्यासाठी नुकताच नगर परिषदेचा १०५ कोटीचा अर्थसंकल्प त्यांनी सभागृहात सादर केला. चिपळूणच्या इतिहासातील हा पहिला मोठा अर्थसंकल्प आहे.

खेराडे यांना सर्वाधिक लढा उक्ताड येथील शौचालयाबाबत द्यावा लागला. महिलांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी आवाज उठविला. खरंतर या विषयात त्यावेळी राजकारण आले नसते, तर तो प्रश्न मार्गी लागला असता. आता केवळ उक्ताडच नव्हे; तर संपूर्ण शहरातील प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी नगराध्यक्षा खेराडे यांनी पुढाकार घेतला असून, स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी डिझेल घोटाळा, टीसीएल घोटाळा उघड केला होता. याआधी शिवसेनेत असतानाही त्यांनी आक्रमकपणे काम केले होते. परंतु, पक्षनेतृत्त्वाने या निवडणुकीत त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला. पक्षाने नाकारले तरी भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन खेराडे या नगराध्यक्षा व नगरसेविका या दोन्ही पदांवर त्या निवडून आल्या. आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी आपली पॉवर दाखवून दिली.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना खेराडे यांनी सामान्य माणसाच्या जीवावर केलेले धाडस त्यांना कामी आले. नागरिकांनी दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी सध्या त्या झपाटल्यासारखे काम करीत आहेत. शहर स्वच्छ व सुंदर करण्याबरोबरच शहराच्या विकासाकडेही त्यांचे विशेष लक्ष आहे. भुयारी गटार योजना, एलईडी दिवे याबरोबरच उद्यानांची डागडुजी करण्याकडेही त्यांनी लक्ष दिले आहे.

सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न धसास लावणे, हा त्यांचा प्रामाणिक हेतू आहे. याच हेतूने गढूळ पाण्याचा प्रश्न, रस्ते, स्मशानशेड अशी कामे यापूर्वी मार्गी लावली आहेत. आता नागरिकांनी बहुमतांनी आपल्याला संधी दिल्याने या संधीचे सोने करताना खºया अर्थाने चिपळूण स्मार्ट सिटी व्हावी, यासाठी आपण कटिबध्द आहोत, असे खेराडे सांगतात.

सध्या भाजी मंडई व व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा झाला आहे. महिलांना बचत गटांच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळत आहे. याच माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी चिपळूण शहरामध्ये मार्केटिंग हब राबविण्याचा मानस आहे.
नगर परिषदेत शिवसेनेसारखा बलाढ्य पक्ष विरोधात आहे. त्या विरोधाची तमा न बाळगता नगराध्यक्षा खेराडे आपला एक एक निर्णय मजबूतपणे घेत आहेत.

जे बरोबर येतील त्यांना सोबत घेऊ नाही तर त्यांना मागे ठेवून काम करण्याची धमक त्यांनी दाखवून दिली आहे. शहराच्या विकासासाठी आपण प्रामाणिकपणे काम करत असताना कोणी कितीही कोल्हेकुई केली, विरोध केला तरी आपण त्याला फारशी किंमत देणार नसल्याचे त्या सांगतात. अतिशय नियोजनबध्दरित्या शहराच्या विकासासाठी त्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रकल्प हाती घेतले आहेत. ते सत्यात उतरले तर चिपळूणला पर्यटनदृष्ट्या अधिक वाव आहे.

या शहराचा कायापालट होतानाच येथील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा कायम राहील हे नक्की. नगराध्यक्षा एक महिला असल्या तरी सक्षमपणे निर्णय घेण्याची त्यांच्यात कुवत आहे,आणि त्यामुळेच त्या गेल्या वर्षभरात विरोधकांच्या विरोधाला बळी न पडता प्रत्येक पाऊल टाकत आहेत.

नगराध्यक्ष म्हणून थेट पसंती

नगराध्यक्ष म्हणून जनतेने थेट पसंती दिलेल्या सुरेखा खेराडे या तडफदार व उच्चशिक्षित आहेत. करसल्लागार म्हणून व्यवसाय सांभाळताना लग्नानंतर त्या राजकारणात आल्या. त्यांचे वडील सदानंद भोसले व त्यांचे दीर विलास खेराडे हे माजी नगरसेवक आहेत.

महिलांचे नेतृत्व करण्याची संधी

राजकारणाशी त्यांचा काही संबंध नव्हता. विविध उपक्रम व कार्यक्रमात सहभागी होऊन महिलांसाठी त्या काम करत होत्या. बहुजन समाजातील महिलेला यानिमित्ताने मानाने नेतृत्व करण्याची संधी चिपळूणवासीयांनी दिली आहे.

अनेक विषयांचा पाठपुरावा

एक महिला म्हणून महिलांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी ठोस पावले उचलली आहेत. शहर विकासासाठी प्रस्ताव करतानाच प्रलंबित कामेही मार्गी लावण्याचा त्यांचा इरादा आहे. पालिकेत सेनेच्या नगरसेविका म्हणून काम करताना अनेक विषयांचा पाठपुरावा त्यांनी केला.

Web Title: Ratnagiri: Surekha Kherade, Chiplun, who owns the crores, is trying to make the city smart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.