रत्नागिरी यावर्षी हापूसचा हंगाम उशिराने, बागायतदारांचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 04:57 PM2017-11-06T16:57:10+5:302017-11-06T17:06:17+5:30

गतवर्षी जिल्ह्यात ६० ते ७० टक्के हापूस पीक आले होते. मात्र हवामानातील बदलामुळे यावर्षी हापूसचे पीक हे गतवर्षीच्या तुलनेत कमी येईल, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकार प्रसन्न पेठे यांनी व्यक्त केला आहे. सध्या हापूस कलमांना अत्यल्प प्रमाणात मोहर आला आहे. हा मोहर टिकण्याची शक्यता कमी आहे. सद्यस्थिती पाहता या हंगामातील हापूस पीक हे फेब्रुवारी, मार्च महिन्यातच मिळेल, असा अंदाज बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.

Ratnagiri This year, the harvest season is late, | रत्नागिरी यावर्षी हापूसचा हंगाम उशिराने, बागायतदारांचा अंदाज

रत्नागिरी यावर्षी हापूसचा हंगाम उशिराने, बागायतदारांचा अंदाज

Next
ठळक मुद्देबागायतदारांमधून कमी हापूसचा अंदाज हंगामातील हापूस पीक फेब्रुवारी, मार्च महिन्यात मिळण्याची शक्यता नोव्हेंबर महिन्यात हापूसच्या झाडांवर ५ ते १० टक्के मोहर

प्रकाश वराडकर

रत्नागिरी : गतवर्षी जिल्ह्यात ६० ते ७० टक्के हापूस पीक आले होते. मात्र हवामानातील बदलामुळे यावर्षी हापूसचे पीक हे गतवर्षीच्या तुलनेत कमी येईल, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकार प्रसन्न पेठे यांनी व्यक्त केला आहे. सध्या हापूस कलमांना अत्यल्प प्रमाणात मोहर आला आहे. हा मोहर टिकण्याची शक्यता कमी आहे. सद्यस्थिती पाहता या हंगामातील हापूस पीक हे फेब्रुवारी, मार्च महिन्यातच मिळेल, असा अंदाज बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.


ज्यावर्षी हापूसचे पीक अधिक येते, त्याच्या दुसऱ्या वर्षी पीक कमी होते. ज्या हापूस कलमांपासून पीक अधिक येते त्या कलमांना पुढील वर्षी पीक कमी येते. काहीवेळा पीकच येत नाही, हा आजवरचा अनुभव पाहता यंदा गेल्या वर्षीपेक्षा उशिराने व कमी हापूस पीक येण्याची दाट शक्यता अनेक बागायतदारांनी व्यक्त केली आहे.


गेल्यावर्षीच्या हापूस हंगामात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात हापूसचे पीक बाजारात आले होते. त्यामुळे हापूसचे बाजारभाव काही काळ कोसळले होते. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात हापूसच्या झाडांवर केवळ ५ ते १० टक्के मोहर आला आहे. हा


तसेच काही प्रमाणात मोहर टिकलाच तर सुरुवातीला अत्यल्प हापूस हाती येईल. काही ठिकाणी हापूस कलमांना पालवी आली आहे. ही पालवी पानात रुपांतरीत होईपर्यंत महिना ते दोन महिन्यांचा कालावधी जाईल. त्यानंतर या हापूस कलमांना मोहर आला तर त्यापासून मिळणारे हापूस पीक हे मार्च, एप्रिल, मे महिन्यातच हाती येईल, असा अंदाजही व्यक्त होत आहे.

Web Title: Ratnagiri This year, the harvest season is late,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.