मुंबई-गोवा महामार्ग मोबदल्यासाठी २७७ कोटीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 05:13 PM2017-10-25T17:13:06+5:302017-10-25T17:15:01+5:30

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी तालुक्यात २६५ कोटी रुपयांचे वाटप झाले असून उर्वरित मोबदला वाटपासाठी आणखी २७७ कोटी ६६ लाख १६ हजार ४१० रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.

Rs 277 crores for the Mumbai-Goa highway | मुंबई-गोवा महामार्ग मोबदल्यासाठी २७७ कोटीची गरज

मुंबई-गोवा महामार्ग मोबदल्यासाठी २७७ कोटीची गरज

Next
ठळक मुद्दे मोबदल्यापोटी ४२ कोटी रुपये न्यायालयात जमा ११ गावांसाठी काही आणखी रक्कम लागणार आणखी २७७ कोटी ६६ लाख १६ हजार ४१० रुपयांची आवश्यकता

चिपळूण, दि. २५ :  मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी तालुक्यात २६५ कोटी रुपयांचे वाटप झाले असून उर्वरित मोबदला वाटपासाठी आणखी २७७ कोटी ६६ लाख १६ हजार ४१० रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.


मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी चिपळूण तालुक्यात शहर वगळता १२ गावांचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. यातील भूधारकांना अद्यापपर्यंत २६५ कोटी रुपयांचे मोबदला वाटप करण्यात आले आहे. चिपळूण तालुक्यासाठी ३७० कोटी रुपयांची पहिल्या टप्प्यात आवश्यकता होती. त्यातील २६८ कोटी रुपये प्राप्त झाले होते.

१३ गावातील भूसंपादन झाले असले तरी काही भूधारकांचे वादांचे निवाडे झाले नव्हते. काही निवाडे हे न्यायालयात पाठविण्यात आले तर काही निवाड्यांचे निर्णय प्रांताधिकाऱ्यानी केले. काही ठिकाणी संयुक्त जमिनीवर काही व्यक्तींची नावे लागली नव्हती. ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली.


चिपळूण शहराचे भूसंपादनाचे कामही हाती घेण्यात आले आहे. यासाठी ९० कोटीपेक्षा अधिक रक्कमेची आवश्यकता आहे. या सर्व मोबदल्यापोटी २७७ कोटी रुपयांची आवश्यकता असून हा निधी लवकरात लवकर प्राप्त व्हावा] यासाठी प्रांताधिकाºयांकडून पत्र व्यवहार सुरु करण्यात आला आहे.


१३ गावांपैकी पेढे-परशुराम गावच्या मोबदल्यापोटी ४२ कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यात आले आहेत. ११ गावांसाठी काही आणखी रक्कम लागणार आहे. न्याय निवाडे झालेल्या भूधारकांची कागदपत्रे तयार करुन ठेवण्यात आली आहेत. निधी प्राप्त होताच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील अशी माहितीही महसूल विभागाकडून देण्यात आली.

Web Title: Rs 277 crores for the Mumbai-Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.