नाणार प्रकल्पाला विरोध करणारे शिवसेना आमदार राजन साळवींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 01:15 PM2018-04-19T13:15:36+5:302018-04-19T13:15:36+5:30

नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलन केल्यानं शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Shiv Sena MLA Rajan Salvi was arrested for opposing the Nanar project | नाणार प्रकल्पाला विरोध करणारे शिवसेना आमदार राजन साळवींना अटक

नाणार प्रकल्पाला विरोध करणारे शिवसेना आमदार राजन साळवींना अटक

Next

रत्नागिरी - नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलन केल्यानं शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मनाई आदेशाचा भंग करत जमाव जमवल्याबद्दल राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांच्यावर गुरुवारी 14 एप्रिल रोजी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. साळवी यांच्यासोबत शिवसेनेचे पंचायत समिती सभापती आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते अशा ३० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सण, नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबतची आंदोलने आणि नगर पंचायत निवडणुका लक्षात घेऊन जिल्ह्यात २ एप्रिल ते १६ एप्रिल या काळासाठी जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश जारी केला आहे. गुरुवारी 14 एप्रिल रोजी या मनाई आदेशाचे उल्लंघन करून शिवसेनेने राजापुरात आंदोलन केले होते. रिफायनरी प्रकल्पासाठी सौदीच्या कंपनीशी बुधवारी सरकारने करार केला. त्याचा निषेध करण्यासाठी आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली राजापुरातील शिवसैनिकांनी सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळला होता. मनाई आदेश असतानाही जमाव जमवून आंदोलन केल्याबद्दल पोलिसांनी 14 तारखेला गुन्हा दाखल केला होता. आज त्यांना अटक करण्यात आली. 

Web Title: Shiv Sena MLA Rajan Salvi was arrested for opposing the Nanar project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.