विघ्रवली परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:46 PM2017-09-28T13:46:13+5:302017-09-28T13:48:42+5:30
संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली पंचक्रोशीत बिबट्याचा मुक्त संचार सुरू झाला आहे. ऐन भातकापणीच्या हंगामात बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
देवरूख , 28 : संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली पंचक्रोशीत बिबट्याचा मुक्त संचार सुरू झाला आहे. ऐन भातकापणीच्या हंगामात बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
तालुक्यातील विघ्रवली, सायले, काटवली, सोनवडे, कोंड ओझरे या गावांमध्ये बिबट्याचा मुक्त वावर सुरू आहे. काही दिवसांपूर्वी काटवली ढोसळवाडी येथे बिबट्या चक्क एका घरात घुसला होता. कधी सायंकाळी तर कधी भर दिवसाही बिबट्याचे दर्शन होत आहे.
या गावांमधील ग्रामस्थ, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी देवरूखला येतात. मात्र परतीच्या प्रवासाला रात्र होते. त्यामुळे अधिकच भीती व्यक्त होत आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय असून बहुतांश शेती जंगलमय भागात आहे. त्यामुळे बिबट्याची दहशत पसरली आहे.
सद्या भातशेती तयार झाली असून पाऊस थांबल्यास येत्या चार दिवसात भातकापणीच्या कामाला जोमाने सुरूवात होईल. मात्र बिबट्याच्या भीतीमुळे या कामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.