अणुस्कुरा घाटात दरड कोळल्याने वाहतूक ठप्प, दरड हटविण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 03:29 PM2018-07-12T15:29:08+5:302018-07-12T15:31:03+5:30

मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री अकराच्या दरम्यान राजापूर तालुक्यातील पूर्व परिसरातील अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. गुरुवारी सकाळपासून दरड घटविण्याचे काम सुरु होते. अणुस्कुरामार्गे जाणारी वाहतूक अन्यमार्गे वळविण्यात आली.

Traffic jam due to ramparts in the Anuskura Ghat, and the debris removal work started | अणुस्कुरा घाटात दरड कोळल्याने वाहतूक ठप्प, दरड हटविण्याचे काम सुरू

अणुस्कुरा घाटात दरड कोळल्याने वाहतूक ठप्प, दरड हटविण्याचे काम सुरू

Next
ठळक मुद्देअणुस्कुरा घाटात दरड कोळल्याने वाहतूक ठप्प, दरड हटविण्याचे काम सुरूकोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बंद

राजापूर : मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री अकराच्या दरम्यान राजापूर तालुक्यातील पूर्व परिसरातील अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. गुरुवारी सकाळपासून दरड घटविण्याचे काम सुरु होते. अणुस्कुरामार्गे जाणारी वाहतूक अन्यमार्गे वळविण्यात आली.

राजापूर आगारातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या भूईबावडामार्गे वळविण्यात आल्या आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रकडून येणाऱ्या गाड्या त्याचमार्गे आल्या. अन्य खाजगी वाहतूक आंबा घाटासहीत भूईबावडा मार्गे सुरु होती. दरम्यान, घाटातील कोसळलेली दरड हटविण्याचे काम संबंधीत बांधकाम विभागाच्यावतीने सुरु होते. जेसीबी मशीनच्या सहाय्याने दिवसभर काम सुरु होते.

घाटात दरड कोसळल्यानंतर तेथून काही अंतरावर असलेल्या अणुस्कुरा पोलीस चेकपोस्टवरील तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अणुस्कुरा घाटात अधून मधून कोसळणाऱ्या दरडीमुळे घाटातून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे.

Web Title: Traffic jam due to ramparts in the Anuskura Ghat, and the debris removal work started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.