तुमच्या बॉयफ्रेन्डमध्ये हे 7 गुण असतील तर लगेच लग्नाला द्या होकार !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 02:35 PM2018-04-26T14:35:12+5:302018-04-26T14:44:55+5:30
आजची जनरेशन लग्न संस्थेकडे शंकेच्या दृष्टीने बघू लागली आहे. या जनरेशनला लिव्ह इन रिलेशनशिप मान्य आहे. त्यांना प्रेम मान्य आहे. पण त्यातील किती तरुणी आपल्या बॉयफ्रेन्डसोबत लग्न करतात यात शंका आहे.
आत्ताच्या जनरेशनमधील तरुण-तरुणींना लग्न करण्यात रस नाही, असं एक निरीक्षण आहे. घरातील लोकांनी मुलींसाठी मुलं पाहणं हा रिवाज गेली कित्येक वर्ष सुरु आहे. आत्ताही अशी लग्न होतात पण प्रमाण कमी झालंय. आजची जनरेशन लग्न संस्थेकडे शंकेच्या दृष्टीने बघू लागली आहे. या जनरेशनला लिव्ह इन रिलेशनशिप मान्य आहे. त्यांना प्रेम मान्य आहे. पण त्यातील किती तरुणी आपल्या बॉयफ्रेन्डसोबत लग्न करतात यात शंका आहे. कारण आजूबाजूच्या लग्न झालेल्यांच्या विविध घटना पाहून ही जनरेशन जरा लग्नापासून पळताना दिसते. पण तुमच्या बॉयफ्रेन्डमध्ये खालील गुण असतील तर तुम्ही त्याच्याशी लग्नाचा विचार करु शकता.
1) ऐकून घेणारा
बोलतात सगळेच. सगळ्यांनाच ओरडता येतं. पण असे फार कमी असतात जे चांगले ऐकून घेणारे असतात. हे फारच दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. अनेकदा अशी स्थिती येते की, तुम्हाला वाटत असतं की, तुमचं कुणीतरी ऐकावं. खासकरुन जेव्हा तुम्ही निराश असता. अशावेळी तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेन्डची मदत मिळत असेल, तो तुमची ही गरज भागवत असेल तर तुम्ही लकी आहात. जर त्याच्याशी बोलून तुम्हाला हलकं वाटत असेल, तुमचा आत्मविश्वास वाढत असेल, तर तो व्यक्ती नक्कीच मॅरेज मटेरिअल आहे.
2) तुम्हाला सपोर्ट करणारा आणि तुमचं यश एन्जॉय करणारा
मुलींसाठी हा बदलता काळ फारच वेगवेगळ्या दृष्टीने संघर्षांचा आहे. खासकरुन मध्यम वर्गीय मुलींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप धडपड करावी लागते. जर अशात तुमचा बॉयफ्रेन्ड तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सपोर्ट करत असेल तर तो तुमच्यासाठी परफेक्ट आहे. जर तो तुमचं यश एन्जॉय करत असेल आणि तुमच्या आनंदात तो सहभागी होत असेल तर त्याच्याशी लग्नाचा विचार करु शकता.
तुम्हाला या सवयी असतील तर तुमचं रिलेशनशिप आहे धोक्यात
3) त्याच्या यशात तुम्हाला स्थान देत असेल
फक्त सोबत फिरणं, पार्ट्या करणं हे न करता तो जर तुम्हाला त्याच्या यशात सहभागी करुन घेत असेल, त्या यशात तुमचाही वाटा सांगून तो तुम्हाला स्पेशल फिल करवत असेल, तर आणखी काय हवंय. तो तुमचा चांगला लाईफ पार्टनर होऊ शकतो.
4) इतरांशी कसा वागतो
तुम्हाला सोडून तुमचा बॉयफ्रेन्ड इतरांशी कसा वागतो हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तो मोठ्यांशी कसा वागतो, लहानांशी कसा वागतो, महिलांशी कसा वागतो हे महत्वाचं आहे. जर तो सारख्याच प्रेमाने सर्वांचा सन्मान करत असेल, त्यांचा आदर करत असेल तर तुम्ही त्याला लाईफ पार्टनर बनवण्याचा विचार करु शकता.
5) त्याच्या निर्णयात तुमचं मत
निर्णय लहान असो वा मोठा तो जर तुम्हाला त्याच्या निर्णयात सहभागी करुन घेत असेल, तुमच्याकडूनही त्यात सल्ला घेत असेल, तुमचं मत विचारत असेल तर ही फारच चांगली बाब आहे. असे गुण फारच कमी लोकांमध्ये आढळतात. त्यामुळे तुमच्या बॉयफ्रेन्डमध्ये जर हा गुण असेल तर त्याने तुमचं नातं आणखीन मजबूत होऊ शकतं.
अशा पुरूषांवर जास्त फिदा होतात महिला !
6) तुमचा ऐकमेकांवर विश्वास आहे
विश्वास हा कोणत्याही यशस्वी नात्याचा मुख्य पाया आहे. विश्वास असेल तर प्रेम टिकतं, वाढतं. विश्वास नसेल तर प्रेम असूच शकत नाही. जर तुम्हा दोघांचाही ऐकमेकांवर विश्वास असेल तर तुम्हाला कुणीही वेगळं करु शकत नाही.
7) राग मनात धरुन न ठेवणारा
वाद-विवाद, भांडण हे प्रत्येक नात्यात होत असतात. पण ही भांडणं, वाद, इगो विसरुन आपण पुन्हा नव्याने कशी सुरुवात करतो हे जास्त महत्वाचं असतं. भांडण जास्त न लांबवता समजूतदारपणा घेणे हा गुण फारच कमी लोकांमध्ये बघायला मिळतो.
मुळात कोणताही व्यक्ती 100 टक्के परफेक्ट नसतो. पण जेव्हा दोन वेगळे व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांना त्यांचं नातं परफेक्ट बनवायचं असतं.