#ValentineWeek2018 : प्रॅामिस डेला आपल्या पार्टनरला करा हे ५ प्रॅामिस, दोघांचं नातं होईल अधिक घट्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 11:05 AM2018-02-11T11:05:31+5:302018-02-11T11:19:49+5:30

एखादं नातम अालं म्हणजे त्यात कमिटमेंट आलीच. त्याशिवाय ते नातं घट्ट होणार कसं?

# ValentineWeek2018: Make Pramis Della your partner 5 Pramis, their relationship will be more tight | #ValentineWeek2018 : प्रॅामिस डेला आपल्या पार्टनरला करा हे ५ प्रॅामिस, दोघांचं नातं होईल अधिक घट्ट

#ValentineWeek2018 : प्रॅामिस डेला आपल्या पार्टनरला करा हे ५ प्रॅामिस, दोघांचं नातं होईल अधिक घट्ट

Next
ठळक मुद्देजोडीदाराचं केलेलं कौतुक हे नेहमीच तुमच्या नातं अबाधित राहण्यासाठी फायदेशीर ठरते.आपण कधी भांडायचं नाही, एकमेकांपासून दूर जायचं नाही, अशा प्रॉमिसेसने आपलं नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करतात आपल्याला जेवढं वाटतं कि आपल्या जोडीदाराने आपलंच ऐकावं तर आधी आपल्यालासुद्धा त्याचं ऐकावं लागतं.

मुंबई : व्हॅलेंटाईन वीकमधला आजचा पाचवा दिवस ११  फेब्रुवारी म्हणजेच प्रॉमिस डे. आज रिलेशनशिपमधली ‘मंडळी’ आपल्या पार्टरनरला प्रॉमिसेस देतात, कमिटमेंट्स देतात. आपण कधी भांडायचं नाही, एकमेकांपासून दूर जायचं नाही, अशा प्रॉमिसेसने आपलं नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही तुम्हाला सुचवत आहोत काही अशी प्रॉमिसेस जी तुम्हा दोघांना एकमेकांच्या अधिक जवळ आणतील सोबत परस्परांवरचा विश्वासही वाढवतील.

१) नेहमी एकमेकांचं ऐकून घेण्याचं प्रॉमिस

दोघांमधली संवाद हा नेहमीच नातं टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जोडीदाराची बाजू ऐकून घेतली पाहिजे कारण त्याशिवाय कोणतंही  नातं टिकणं कठीण असतं. संवाद हा नेहमी दोन्ही बाजूंनी असायला हवा, कारण त्यालाच संवाद म्हणतात. आपल्याला जेवढं वाटतं कि आपल्या जोडीदाराने आपलंच ऐकावं तर आधी आपल्यालासुद्धा त्याचं ऐकावं लागतं. तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने एकमेकांना समजून घेणं आवश्यक असतं.

आणखी वाचा - या ५ गोष्टी पार्टनरसाठी कधीच करू नका

२) नात्यात पारदर्शकता असण्याचं प्रॅामिस

जेव्हा एखाद्या नात्याची सुरुवात होते तेव्हा जोडीदाराच्या काही गोष्टी आपल्याला खटकतात तर काही आवडतात. पण पटत नसलेल्या गोष्टीसाठी आपण जोडीदाराला स्वभाव बदलण्यासाठी सांगणं चूकीचं ठरू शकतं. जोडीदाराच्या मूळ स्वभावाचा आदर करून प्रेम करणं महत्त्वाचं असतं. तो जसा आहे तसा त्याला स्विकारणं म्हणजेच खरं प्रेम ना?

आणखी वाचा - या ४ कारणांमुळे मुलं कमिटमेंटपासून राहतात दूर

३) जोडीदाराला पुरेसा वेळ देण्याचं प्रॅामिस

आयुष्य कितीही धकाधकीचं असलं तरी जोडीदाराला वेळ देणं गरजेचं असतं. नातं टिकवण्यासाठी एकमेकांचा सहवास गरजेचा असतो. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ देत नसाल तर प्रोमिस डे पासून नक्की वेळ द्या. कारण कितीही नाही म्हटलं तरी कायमच दुर राहणं नातं संपवु शकतो. त्यामुळे या नात्यांत शारिरीक, भावनिक आणि मानसिक जवळीकता गरजेची असते.

आणखी वाचा - मुलींना प्रपोज करण्याच्या या ५ टीप्स नक्की वाचा.

४) कठीण परिस्थितीतदेखील नेहमी एकमेकांसोबत राहण्याचं प्रॅामिस

जेव्हा आपण आपल्या जोडीदाराला कमिटमेंट देतो तेव्हा पडत्या काळातदेखील आपण त्याच्यासोबत राहिलं पाहिजे. जर तुमच्या जोडीदाराला बरं नसेल तर तुम्ही त्या दिवसात दाखवलेली काळजी ही खूप जिव्हाळा निर्माण करते. तो कसल्या तणावात असेल तर आपल्याशी बोलून त्याला बरं वाटलं पाहिजे. आपण त्याचा तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रत्यक्ष काही करु शकत नसलो तरी त्याला त्यात भावनिक आधार देण्याचं काम नक्कीच करु शकतो.  

आणखी वाचा -  रोझ डेपासून व्हॅलेंटाईन्स डेपर्यंत, जाणून घ्या कसा असतो Valentine's Week

५) नेहमी एकमेकांचा आदर करण्याचं प्रॉमिस

नात्यांमध्ये एकमेकांचा आदर करणं खूप महत्त्वाचं आहे. आदर केल्याने प्रेमात गोडवा तयार होता. जोडीदाराचं केलेलं कौतुक हे नेहमीच तुमच्या नातं अबाधित राहण्यासाठी फायदेशीर ठरते. जेव्हा जास्त इन्सल्ट (अनादर) तेव्हढी घट्ट मैत्री हे लॉजिक फक्त मैत्रीच्या नात्याला संबोधित करतं, पण प्रेमाच्या नात्यात परस्परांचा आदर तोही खाजगीमध्ये आणि इतरांसोबत असतानादेखील करणं गरजेचा आहे. इतरांसमोर आपला अनादर झालेला कोणताच जोडीदार चालवून घेणार नाही.

आजच्या दिवशी आपल्या व्हॅलेंटाईनचा हात हातात घेऊन ही प्रॉमिसेस करा. त्यांच्या मनात तुमच्याविषयीचा आदर तर दुणावेलच पण तुमच्याप्रती असलेलं प्रेमही वाढेल. तसंच तुम्ही त्यांना काही प्रॉमिसेस दिली पण तुम्हालासुध्दा त्यांच्याकडून अशा कमिटमेंटची अपेक्षा असेल तर जरा धीर धरा. तुमचा पार्टनरसुध्दा अशा काही नातं मजबुत करणाऱ्या कमिटमेंट्स आणि प्रॉमिसेस तुम्हाला देणार आहे. तुमच्या दोघांतला हा संवाद कायम असावा राहावा, याची काळजी घ्या.

Web Title: # ValentineWeek2018: Make Pramis Della your partner 5 Pramis, their relationship will be more tight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.