Video : बॉयफ्रेन्डचं जगणं मुश्किल करतात या प्रकारच्या गर्लफ्रेन्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 11:45 AM2019-02-14T11:45:07+5:302019-02-14T11:45:51+5:30
प्रेमात पडणं जितकं सोपं असतं तितकं ते निभावणं अजिबातच सोपं नसतं. कारण सुरूवातील गुडीगुडी वाटणारं हे प्रेमाचं नातं वेगळं वळण घेतं.
(Image Credit : Guy Counseling)
प्रेमात पडणं जितकं सोपं असतं तितकं ते निभावणं अजिबातच सोपं नसतं. कारण सुरूवातील गुडीगुडी वाटणारं हे प्रेमाचं नातं वेगळं वळण घेतं. याला कारण म्हणजे काही वेळ सोबत घालवल्यावरच दोन वेगवेगळे व्यक्ती एकमेकांना ओळखू लागतात. मग दोघांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी भांडणं होतात.
प्रेमाच्या नात्यात दोघेही सारखे असले किंवा दोघेही समजून घेणारे असले तर गोष्टी फारच सोप्या होतात. पण दोघांमधील काही सवयी नातं तुटण्याला कारणीभूत ठरतात. मुलांप्रमाणेच मुलींच्याही काही सवयी मुलांचं जगणं हैराण करुन सोडतात. चला जाणून घेऊया अशाच काही गर्लफ्रेन्ड ज्या आपल्या स्वाभावाने आणि सवयींनी बॉयफ्रेन्डचं जगणं हैराण करतात.
1) पझेसिव्ह गर्लफ्रेन्ड
तुम्ही जर मित्रांसोबत कुठे बाहेर जाणार असाल किंवा एखाद्या मैत्रिणीसोबत बोलत असाल त्यावर आक्षेप घेणार असेल तर अशा गर्लफ्रेन्डला पझेसिव्हच म्हणणार ना? अशाप्रकारच्या मुलींना त्यांचा बॉयफ्रेन्ड सतत त्यांच्या आजूबाजूला हवा असतो.
2) वापरुन घेणाऱ्या गर्लफ्रेन्ड
कधी कधी काही मुली या केवळ तुमच्या माध्यमातून त्यांना हवं ते मिळवण्याच्या बेतात असतात. तुमच्याकडून त्यांना हवे असणारे कॉन्टॅक्ट काढून घेतात आणि मग दूर जातात. असेही होऊ शकते की, ती केवळ तुमच्या पैशांवरच प्रेम करत असेल. या गोष्टीचा खुलासा झाल्यावर तुम्हाला त्रास होतो.
3) आपली चूक मान्य न करणाऱ्या गर्लफ्रेन्ड
प्रेमाच्या नात्यात अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडणं होत असतात. दोघांमध्ये काही वादही होतात. पण ज्यांची चुकी आहे त्यांनी मान्य केल्यास वाद मिटतो. पण काही गर्लफ्रेन्ड अशा असतात ज्या आपली चुकी मान्य करत नाहीत आणि याने अडचणी आणखी वाढतात. काही मुलींचा इगो प्रॉब्लेमही असतो.
4) सतत दु:खी असणाऱ्या गर्लफ्रेन्ड
आपला आनंद आणि दु:खं आपल्या बॉयफ्रेन्डकडे शेअर करणं चांगलं असतं. पण सतत आपल्या आयुष्यात होत असलेल्या नकारात्मक गोष्टींनी तुम्हाला नकारात्मक करत असेल तर अशा मुलीपासून दूर राहिलेलं बरं.
5) कन्फ्यूज गर्लफ्रेन्ड
काही मुलीं या फारच कन्फ्यूज असतात. त्यांना आयुष्यात काय करायचं आहे याचा निर्णयही घेऊ शकत नसेल. ती तुमच्यासोबत प्रेमात आहे की, केवळ आकर्षण आहे हेही तिला कळत नसेल तर सगळं फार कठीण होऊ शकतं.
6) डोमिनेटींग गर्लफ्रेन्ड
जर तुमच्या गर्लफ्रेन्डला वाटत असेल की, तुम्ही केवळ ती सांगते तसंच करायला हवं, तिने सांगितलं तसंच वागायला हवं तर या प्रकाराला डॉमिनेटींग म्हणता येईल. कधी कधी अशा मुलींचं वागणं हे बॉस सारखं असतं. अशा मुलींपासून दूर राहिलेलंच बरं.
7) संशयी गर्लफ्रेन्ड
काही गर्लफ्रेन्ड या सतत आपल्या बॉयफ्रेन्डवर संशय घेतात. त्यांचा फोन चेक करणे, त्यांचा ईमेल चेक करणे, कुणाशी बोलतोय, काय बोलतोय या गोष्टींवर सतत लक्ष ठेवतात. तुमचं काहीच नसताना जर तुमची गर्लफ्रेन्ड अशाप्रकारे वागत असेल तर अशा मुलीमुळे तुमचं जगणं कठीण होऊ शकतं.
8) सतत भांडणं करणाऱ्या गर्लफ्रेन्ड
काही गर्लफ्रेन्डना सतत छोट्या छोट्या गोष्टींनवरुन भांडण उखरुन काढण्याची सवय असते. त्यांना केवळ भांडणाला निमित्त लागतं. अशा गर्लफ्रेन्डमुळे तुमच्याही आयुष्यातील आनंद हिरावला जाऊ शकतो.