तुम्हाला तुमच्या क्रशला आकर्षित करायचंय? तर वापरा हे खास फंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 01:43 PM2018-04-25T13:43:20+5:302018-04-25T15:01:36+5:30
कदाचित तुम्ही या गोष्टीचा कधी विचार केला नसेल पण आपली बॉडी लॅंग्वेज महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यात महत्वाची भूमिका बजावते.
(Image Credit: datetricks.com)
कदाचित तुम्ही या गोष्टीचा कधी विचार केला नसेल पण आपली बॉडी लॅंग्वेज महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यात महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळेच तुम्ही एखाद्या मुलीसोबत बोलायला जात असाल किंवा तिला भेटायला जात असाल किंवा तुम्हाला तुमच्या क्रशचं तुमच्याकडे लक्ष वेधून घ्यायचं असेल तर खालील गोष्टींची काळजी घेतली तर फायदा तुमचाच....
1) नेहमी समोर या
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पसंत करु लागले आहात. तर तिच्यापासून दूर न पळता तिला सतत फेस करा. तुम्ही जर तिच्यापासून दूर पळत असाल तर तुमचं होणारं कामही बिघडू शकतं. अशात जर तुम्ही तिच्याशी बोलत असाल आणि बोलणं झाल्यावर लगेच तेथून निघून जात असाल तर तसे करणे टाळा. तुम्हाला ती व्यक्ती आवडते हे दिसू द्या.
2) आत्मविश्वास
महिला या स्ट्रॉंग आत्मविश्वासू पुरुषांकडे अधिक आकर्षित होतात. अशा पुरुषांसोबत त्या स्वत:ला सुरक्षित फिल करतात. त्यामुळे तुमचं बॉडी पोस्चर हे स्ट्रॉंग असायला हवं. भेटताना नेहमी आत्मविश्वास ठेवा.
(रागावलेल्या गर्लफ्रेन्डला मनवण्याच्या काही रोमॅंटिक आयडिया)
3) नजर से नजर मिलाना
जर तुम्ही योग्य प्रकारे वेळोवेळी तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या नजरेत बघाल तर तुम्हाला जास्त बोलण्याची गरज पडणार नाही. फक्त विचित्र किंवा तिला अवघडेल अशा नजरेने तिच्याकडे बघू नका. असं नाही की, तिच्याकडे एकसारखं बघायला हवं, कधी कधी तुम्ही इकडे तिकडेही बघा.
4) असे राहा उभे
जर तुम्ही सोबत आहात आणि बोलत आहात तर तुम्ही कसे उभे आहात हे बघणंही महत्वाचं ठरतं. जर ती तुमच्याकडे येण्यासाठी पाऊल पुढे टाकत असेल तर चुकूनही तुम्ही पाय मागे घेऊ नका. उलट तिच्या दिशेने पाऊल पुढे टाका. जर तुम्ही तुमचं पाऊल मागे टाकलं, तर कदाचित तिला वाटेल की, तुम्हाला तिच्यात इंटरेस्ट नाही.
(मुलीला प्रपोज करण्याआधी या 5 गोष्टींची घ्या काळजी)
5) उगाचच हसणं टाळा
काही वेळा तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत असताना खूश आहात हे दाखवण्यासाठी जबरदस्तीने किंवा उगाच हसता. कधी कधी हे चालून जातं, तर कधी कधी अंगलट येतं. सोबत असताना महिला या नेहमी तुमच्या हावभावांकडे लक्ष देऊन असतात. अशात जर तुम्ही उगाच हसताना पकडले गेलात तर तुमचं कठीण आहे.