पतंगरावांच्या अस्थिकलशाचे सांगलीत दर्शन , सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 06:51 PM2018-03-17T18:51:21+5:302018-03-17T18:51:51+5:30
सांगली : कॉँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांचा अस्थिकलश शनिवारी सांगलीच्या स्टेशन चौकात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.
सांगली : कॉँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांचा अस्थिकलश शनिवारी सांगलीच्या स्टेशन चौकात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. सर्वच पक्षाचे नेते, कार्यकर्ते, विविध संघटना तसेच नागरिकांनीही यावेळी अभिवादनासाठी गर्दी केली होती.कॉँग्रेसच्यावतीने हा अस्थिकलश शनिवारी सांगलीत स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ््याजवळ आणण्यात आला.
सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत तो ठेवण्यात आला होता. यावेळी महापौर हारुण शिकलगार, कॉँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील, जयश्रीताई पाटील, महापालिकेचे विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, महापालिकेचे नगरसेवक राजेश नाईक, दिलीप पाटील, पांडुरंग भिसे, वंदना कदम, अनारकली कुरणे, शेवंता वाघमारे, बाळासाहेब मुळके, जमीर कुरणे, विशाल कलगुटगी, राष्टÑवादीचे विधासभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, जि. प. च्या माजी अध्यक्षा मालन मोहिते, रवींद्र खराडे, बिपीन कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, सतीश साखळकर आदी उपस्थित होते. सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांच्यावतीने अस्थिकलशास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हा अस्तिकलश मिरजेला नेण्यात आला.
स्मारक ठिकाणी आठवणी
ज्या स्टेशन चौकात त्यांचा अस्थिकलश ठेवण्यात आला त्याठिकाणचे वसंतदादा स्मारकाचे कामही पतंगरावांमुळेच गतिमान झाले होते. या गोष्टीची कल्पना सांगलीकरांनाही आहे. त्यामुळेच अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी नेते, कार्यकर्त्यांबरोबर सामान्य नागरिकांनीही याठिकाणी गर्दी केली होती.