सांगलीत शिवसेनेचे भाजपविरोधात गाजर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:52 PM2018-12-12T12:52:47+5:302018-12-12T12:54:59+5:30
सांगली जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी भाजप मंत्री व लोकप्रतिनिधींची आश्वासने खोटी निघाल्याच्या निषेधार्थ बुधवारी शिवसेनेच्यावतीने सांगलीच्या स्टेशन चौकात निदर्शने करण्यात आली. आश्वासनांची पूर्तता तातडीने न केल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
सांगली : जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी भाजप मंत्री व लोकप्रतिनिधींची आश्वासने खोटी निघाल्याच्या निषेधार्थ बुधवारी शिवसेनेच्यावतीने सांगलीच्या स्टेशन चौकात निदर्शने करण्यात आली. आश्वासनांची पूर्तता तातडीने न केल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
ह्यजनतेला गाजर दाखविणाऱ्या भाजपचा धिक्कार असोह्ण,या भाजपचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा घोषणा देत शिवसैनिक आंदोलन सहभागी झाले होते. पदाधिकाऱ्यांनी यावेळी गाजर हाती घेत भाजपच्या खोट्या आश्वासनांविरोधात निदर्शने केली.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात शिवसेनेने म्हटले आहे की, सांगली तालुका, आयर्विन पुलाला समातंर पर्यायी पुल, पेठ नाका ते मिरज सहापदरी रस्ता, सांगलीत सुसज्ज कारागृह, आंतरराष्ट्रीय ड्रायपोर्ट, हरीपूर ते कोथळी नवा पुल, महापालिकेला शंभर कोटींचा निधी, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र, सांगलीला स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय अशा अनेक घोषणा भाजपने गेल्या काही वर्षात केल्या.
भाजपचे मंत्री प्रत्येक दौºयात अशी आश्वासने देत आहेत. भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधीही नवनव्या घोषणा करण्यात पटाईत आहेत. प्रत्यक्षात आजवर केलेल्या त्यांच्या घोषणांपैकी एकाचीही पूर्तता झाली नाही. त्यामुळे जनतेला केवळ आश्वासनांचे गाजर दाखविण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.
जनतेला फसविण्याचा हा उद्योग त्यांनी बंद करावा. आम्ही अशा फसव्या राजकारणाचा निषेध करीत आहोत, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. आंदोलनात यावेळी बजरंग पाटील, अजिंक्य पाटील, अनिल शेटे, सुनिता मोरे, रावसाहेब घेवारे, धर्मेंद्र कोळी, जितेंद्र शहाआदी सहभागी झाले होते.