अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सोमवारी दोषारोपपत्र ‘सीआयडी’ची लगबग : कोल्हापूरचे पथक मदतीसाठी सांगलीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 09:25 PM2018-02-02T21:25:42+5:302018-02-02T21:26:04+5:30
सांगली : पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी अटकेतील पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातजणांविरुद्ध सोमवार, दि. ५ फेब्रुवारीला जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ‘सीआयडी’ची लगबग सुरू आहे. त्यांना मदतीसाठी कोल्हापूर सीआयडीचे पथक सांगलीत दाखल झाले आहे.
अनिकेतच्या खून प्रकरणाला येत्या ६ फेब्रुवारीला ९० दिवस पूर्ण होत असल्याने, तत्पूर्वी दोषारोपपत्र दाखल करावे लागणार आहे.सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबर २०१७ रोजी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. कोठडीच्या पहिल्याचदिवशी गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला नग्न करुन उलटा टांगून बेदम मारहाण केली होती. यामध्ये अनिकेतचा मृत्यू झाला होता.
हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी ७ नोव्हेंबरला अनिकेतचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे नेऊन जाळला होता. याप्रकरणी ८ नोव्हेंबरला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक व मुख्य संशयित युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले या सहाजणांना अटक केली होती. संशयित आरोपीचा कोठडीत मृत्यू झाल्याने हा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला. या घटनेमुळे सांगली पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली.
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह पोलिस महासंचालकांनाही सांगलीत यावे लागले होते. त्यानंतर घटनेदिवशी ड्युटीवर हजर असणारे ठाणे अंमलदार मिलिंद शिंदे यांच्यासह सात पोलिसांना निलंबित करण्यात आले.सीआयडीच्या तीन महिन्याच्या तपासात केवळ कामटेचा मामेसासरा बाबासाहेब कांबळे याचे नाव निष्पन्न झाले. दीड महिन्यापूर्वी त्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणात नव्याने कोणीही संशयित वाढले नाहीत. हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाणार आहे. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे.
शासनाने कोथळे कुटुंबास दहा लाखाची आर्थिक मदत दिली आहे. अनिकेतच्या पत्नीला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. पण अजून या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. अनिकेतचा मृतदेह कुटुंबियांनी महिन्यापूर्वी ताब्यात घेतला होता. अनिकेतचा मित्र अमोल भंडारे अजूनही लूटमारीच्या गुन्'ात कारागृहात आहे. तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने सीआयडीने दोनवेळा कारागृहात जाऊन त्याचा जबाब घेतला आहे.
अनेक बाबींचा उलगडा होणार!
अनिकेत कोथळे खून प्रकरणास येत्या ६ फेब्रुवारीला तीन महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे. तत्पूर्वी ५ फेब्रुवारीला (सोमवार) कामटेसह सातजणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याची सीआयडीची लगबग सुरू आहे. त्यांच्या मदतीसाठी कोल्हापूर सीआयडीचे पथक आले आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा होणार आहे. यामध्ये किती साक्षीदार आहेत, किती जणांची चौकशी झाली, आणखी कोणाचा सहभाग आहे का, पुरवणी दोषारोपपत्र दाखल होणार का, याची माहिती मिळू शकणार आहे.
‘ते’ दोघे कोण?
अनिकेतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कामटेचे पथक ६ नोव्हेंबरला पहाटेपर्यंत सांगली शहरात फिरत होते. त्याचवेळी अमोल भंडारे पळून गेल्याचा बनाव रचला होता. भंडारे कोणाला दिसू नये, यासाठी त्याला घेऊन दोन संशयित कृष्णा नदीच्या काठावर बसले होते, अशी माहिती खुद्द विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली होती. सीआयडीनेही तपासातून याचा उलगडा केला जाईल, असे सांगितले होते. पण तीन महिन्याच्या तपासातून