कॉंग्रेसचा सांगलीत बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 03:43 PM2017-09-19T15:43:09+5:302017-09-19T15:46:06+5:30

पेट्रोल व डिझेलमध्ये झालेल्या दरवाढीच्या निषेधार्थ मंगळवारी सांगली शहर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. दरवाढ मागे घेतली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.

Congolese ballagadi front of Congress | कॉंग्रेसचा सांगलीत बैलगाडी मोर्चा

पेट्रोल व डिझेलमध्ये झालेल्या दरवाढीच्या निषेधार्थ मंगळवारी सांगली शहर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. दरवाढ मागे घेतली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.

Next
ठळक मुद्देजिल्हा कॉंग्रेसच्यावतीने दरवाढीचा निषेध सांगलीच्या झुलेलाल चौकातून मोर्चाशास्त्री चौकापर्यंत शासनाच्याविरोधात निदर्शनेआंदोलनकर्त्यांनी केला केंद्रीय मंत्र्यांचा निषेध

सांगली : पेट्रोल व डिझेलमध्ये झालेल्या दरवाढीच्या निषेधार्थ मंगळवारी
सांगली शहर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. दरवाढ
मागे घेतली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.

सांगलीच्या झुलेलाल चौकातून हा मोर्चा शास्त्री चौकापर्यंत आला. याठिकाणी
केंद्र व राज्य शासनाच्या निषोधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. एका
बैलगाडीत मोटारसायकल टाकून इंधन दरवाढीचा प्रतिकात्मक निषेध व्यक्त
करण्यात आला. ‘मोदीची आता तुमच्यावर जनतेचा भरोसा हाय का? असा सवाल
व्यक्त करणारे फलकही झळकविण्यात आले. झुलेलाल चौकातील एका सभागृहात
मोर्चापूर्वी कॉंग्रेसची सभा पार पडली.


या सभेत कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले की, इंधन
दरवाढीतून केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. सध्या
राज्यात पेट्रोलचा दर ८0 रुपये, तर डिझेलचा दर ६२.३६ इतका आहे. अडिच
महिन्यात पेट्रोलदरात १६ रुपये तर डिझेल दरात ४  रुपयांनी वाढ झाली आहे.
इंधन दरवाढीचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फटका सामान्य लोकांना बसत आहे.


कॉंग्रेसच्या काळात १0५ डॉलर प्रति बॅरेल क्रुड आईलचा दर असताना
पेट्रोलचा दर ६0 रुपये प्रतिलिटर होता. आता भाजपच्या काळात क्रुड आॅईलचे
दर ५0 डॉलर प्रति बॅरेल असताना  पेट्रोलचा दर मात्र ८0 रुपयांच्या घरात
गेला आहे. इंधन दरवाढीतून सरकारला मोठे घबाड लागले आहे. सध्या पेट्रोलचा
दर क्रुड र्आॅईलच्या दराचा विचार करता ३५ ते ४0 रुपये प्रतिलिटर असायला
हवा होता, मात्र दर वाढतच चालले आहेत.


राज्य शासनानेही भरीस भर म्हणून या दरात आणखी वाढ केली आहे. अन्य
राज्यांचा विचार केला तर दिल्लीत ७0, कोलकाताला ७३, चेन्नईला ७२,
गोव्याला ६४ रुपये आणि कर्नाटकात ७१ रुपये पेट्रोल आहेत. महाराष्टÑाचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने महाराष्टÑात हाच दर ८0
रुपयांच्या घरात आहे. दूध, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तुंच्या दरात,
उद्योग व्यापाºयांवर या दरवाढीचा प्रत्यक्ष फटका पडला आहे, असे ते
म्हणाले.


यावेळी नगरसेवक राजेश नाईक, शेवंता वाघमारे, पुष्पलता पाटील, मंगेश
चव्हाण, करीमभाई मेस्त्री, रवी खराडे, निसार संगतरास, अल्ताफ शिकलगार,
किरणराज कांबळे, पौगंबर शेख, राजन पिराळे, जावेद शेख, रावसाहेब
माणकापुरे, बी. जी. बनसोडे, आदी सहभागी झाले होते.


केंद्रीय मंत्र्यांचा निषेध

केंद्रीय पर्यटनमंत्री के. जे. अल्फोन्स यांनी इंधन दरवाढीसंदर्भात मत
मांडताना या दरवाढीने सामान्य जनता उपाशी राहणार नसल्याचे वक्तव्य केले
होते. आंदोलनकर्त्यांनी मंगळवारी या वक्तव्याचा निषेध केला. असंवेदनशील
सरकारमधील असंवेदनशील मंत्र्यांना आवर घालण्याची मागणी करण्यात आली.⁠⁠⁠⁠

Web Title: Congolese ballagadi front of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.