कडधान्ये-तृणधान्ये, तेलबिया नियमनमुक्तीचा विचार : सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 07:25 PM2017-10-08T19:25:58+5:302017-10-08T19:34:52+5:30
भाजीपाला नियमनमुक्तीनंतर आता कडधान्ये, तृणधान्ये आणि तेलबियाही नियमनमुक्त करण्याचा विचार आहे. शासनाने यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
इस्लामपूर, 8 : भाजीपाला नियमनमुक्तीनंतर आता कडधान्ये, तृणधान्ये आणि तेलबियाही नियमनमुक्त करण्याचा विचार आहे. शासनाने यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
खोत म्हणाले, भाजीपाला नियमनमुक्तीचा निर्णय घेतल्यावर शेतकºयांची अडत, हमाली, तोलाई आणि बाजार समित्यांचा सेस अशा सगळ्या जाचातून मुक्तता झाली. त्यामुळे शेतकरी आपला भाजीपाला कोठेही विकू शकतो. नियमनमुक्तीच्या या लाभानंतर आता शेतकºयांनी कडधान्य, तृणधान्य आणि तेलबियासुध्दा नियमनमुक्त करा, अशी मागणी केली आहे.
ते म्हणाले, शेतकºयांच्या या मागणीचा विचार करुन मुख्यमंत्र्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. शेतकºयांच्या मागणीनुसार कडधान्य, तृणधान्य व तेलबिया नियमनमुक्त करण्याचा शासनाचा सकारात्मक विचार आहे. नियमनमुक्तीचा हा निर्णय झाल्यावर शेतकºयांना बाजारभावापेक्षा १०० रुपयांचा जादा दर मिळेल. त्यामुळे समिती आपला अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे.
यवतमाळ घटनेबाबत शासन गंभीर
खोत म्हणाले, यवतमाळ येथील शेतकरी मृत्यूप्रकरणी सरकार गंभीर आहे. या घटनेत दोषी असणारे अधिकारी, औषध विक्रेते आणि कंपन्यांविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करुन मृत शेतकºयांच्या वारसांना नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न आहे.
यवतमाळ येथे जाऊन आपण स्वत: पाहणी केली आहे. सर्व वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर या शेतकरी मृत्यूप्रकरणी दोषी असणाºयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केल्याचेही कृषी राज्यमंत्री खोत यांनी स्पष्ट केले.