सांगली महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव: जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 11:28 PM2018-06-24T23:28:43+5:302018-06-24T23:29:12+5:30

Demand for Sangli municipal elections: Jayant Patil | सांगली महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव: जयंत पाटील

सांगली महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव: जयंत पाटील

Next


कुपवाड : महापालिकेची यंदाची निवडणूक का जाहीर होत नाही, हे समजेनासे झाले आहे. तेरा आॅगस्टला महापालिकेचा नवा महापौर निवडावा लागणार आहे. तरीही ही निवडणूक जाहीर होत नाही. जनमानसात फार पाठिंबा मिळत नसल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा भाजपचा डाव आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी केली.
आ. पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा कुपवाड शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी महापौर सुरेश पाटील, जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, श्रीनिवास पाटील, धनपाल खोत, विष्णू माने, शेडजी मोहिते, जमीर रंगरेज प्रमुख उपस्थित होते.
आ. पाटील पुढे म्हणाले, महापालिका क्षेत्राची जबाबदारी यापूर्वी एकदा जनतेने आम्हाला दिलेली होती. त्यावेळी कुपवाडचा पाणी प्रश्न सोडविलेला आहे. शाळांचे प्रश्नही मार्गी लावले होते. यापुढील काळात शहरात भव्य उद्यानासह इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. देशात भूलथापा मारून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारबद्दल जनमानसात प्रचंड नाराजी आहे. भाजपचे मंत्री विकासाऐवजी वेगळ्याच कामात रस दाखवित असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी संजय बजाज, सुरेश पाटील, विष्णू माने, धनपाल खोत, शेडजी मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकाश व्हनकडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास जमीर रंगरेज, मोहनसिंग रजपूत, बल्लू शाखला, दत्ता पोटोळे, भूपाल सरगर, सागर खोत, आशुतोष धोतरे, विजय खोत, संजय औधकर, मेजर जंबूलाल खताळ उपस्थित होते.

Web Title: Demand for Sangli municipal elections: Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.