राज्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास ध्येय आणि चिकाटीमुळेच : शेखर चरेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:25 AM2018-04-11T01:25:24+5:302018-04-11T01:25:24+5:30

शिराळा : ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर मी पिग्मी एजंट ते राज्यमंत्री असा प्रवास केला. तसेच आयुष्यभर ध्येयाशी एकनिष्ठ राहिलो, असे प्रतिपादन राज्य सहकार परिषद पुणेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर

Journey to the Minister of State, due to the mission and persistence: Shekhar Charaggaonkar | राज्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास ध्येय आणि चिकाटीमुळेच : शेखर चरेगावकर

राज्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास ध्येय आणि चिकाटीमुळेच : शेखर चरेगावकर

googlenewsNext
ठळक मुद्देशिराळा येथे ब्राह्मण समाज मेळावा उत्साहात

शिराळा : ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर मी पिग्मी एजंट ते राज्यमंत्री असा प्रवास केला. तसेच आयुष्यभर ध्येयाशी एकनिष्ठ राहिलो, असे प्रतिपादन राज्य सहकार परिषद पुणेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केल.
शिराळा येथील ब्राह्मण समाज सेवा संस्थेच्यावतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथजी महाराज, माजी आमदार मानसिंगराव नाईक, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख, अखिल भारतीय ब्राह्मण महिला आघाडीच्या सातारा जिल्हा सचिव सौ. शरयू माटे, कºहाड तालुका अध्यक्षा सौ. अनघा कुलकर्णी, कºहाड तालुका कोषाध्यक्षा सौ. वृषाली देशपांडे, ब्राह्मण संघ कºहाड तालुका अध्यक्ष श्रीकांत साने, रामभाऊ आफळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चरेगावकर म्हणाले की, आपल्या समाजाने, जमलं तर करुया, आपल्या अंगावर तर काय येणार नाही ना? आपण केले तर चालेल का? या व्यथित करणाऱ्या प्रश्नांपासून लांब राहिले पाहिजे. तरच जीवनात यशाचा राजमार्ग दिसेल. अन्यथा आयुष्यभर निराशा मनात घर करून राहील. व्यवसाय करायचाच आहे, तर मोठ्या उद्योगांकडे पाहू नका. हजारातील व्यवसायसुद्धा तुम्हाला करोडपती बनवू शकतो. हे करताना फक्त अंधानुकरण करू नका. कारण तुमची वाट त्यावेळी चुकण्याची शक्यता असते.
मानसिंगराव नाईक म्हणाले, समाजाची उन्नती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वच क्षेत्रात आपल्या गुणांनी त्यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. शिराळा ब्राह्मण संघाचे काम खरंच कौतुकास्पद आहे.
यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक म्हणाले, प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची मानसिकता बदलल्यास समाजाची प्रगती आपोआप बदलेल. यासाठी संघटन आणि सद्चारित्र्य महत्त्वाचे आहे.
यशवंत कुलकर्णी म्हणाले, सुखात आणि सुतकात जो समाज एक होतो, तोच माणुसकीला खरी ताकद देतो. समाज मोठा झाला, परंतु नाती दुरावली गेली. ती जोडण्याचे काम आपण भविष्यात करुया. तेच परमेश्वरास मान्य असेल.
सोनल भोसेकर म्हणाल्या, महिलांचा सन्मान आणि त्यांचे रक्षण ही जबाबदारी आता आपल्यावर येऊन ठेपली आहे. लघुउद्योगांपासून सुरू झालेला प्रवास नामांकित उद्योजकांपर्यंत येऊन थांबतो. ही आज महिलाशक्तीची खरी ताकद आहे.
डॉ. अभिजित जोशी, वनपरिक्षेत्र अधिकारी बाळकृष्ण हसबनीस, सोनाली नवांगूळ, सोनल भोसेकर, वैभवी हसबनीस, डॉ. अभिजित जोशी, विपिन हसबनीस, अनिकेत कळमकर, नारायण जोशी, बाळकृष्ण हसबनीस, वैभवी कुलकर्णी, डॉ. सुनील जोशी, सुनील हसबनीस, दिनेश हसबनीस, संतोष देशपांडे, विठ्ठल जोशी, श्रीकांत इनामदार यावेळी उपस्थित होते.
उमेश कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष विद्याधर कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. प्रशांत कुलकर्णी यांनी आभार मानले. रवींद्र हसबनीस यांनी सूत्रसंचालन केले. वेदश्री पटवर्धन हिने पसायदान म्हटले.

समस्या : प्रगतीचे लक्षण
कामात समस्या येणे हे प्रगतीचे लक्षण आहे. त्यामुळे निराश न होता मार्गक्रमण करा. भविष्यातील प्लॅन डोळ्यासमोर ठेवून अनुभवी लोकांना साथीला घ्या. तेव्हाच आर्थिकदृष्ट्या तुम्ही मजबूत होऊन मूलभूत प्रश्नांवर भर द्याल, असे चरेगावकर म्हणाले.

Web Title: Journey to the Minister of State, due to the mission and persistence: Shekhar Charaggaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.