कामगार विश्वात अस्वस्थता, अस्थिरतेचा धूर- कामगार क्षेत्रात पगाराची समस्या-कामगार विशेष दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 11:25 PM2018-04-30T23:25:28+5:302018-04-30T23:25:28+5:30
सांगली : एकीकडे रोजगार निर्मितीच्या घोषणा, दुसरीकडे प्रतिकूल परिस्थितीचे काटेरी कुंपण... अशा दुष्टचक्रामुळे सांगली जिल्ह्यातील कामगारविश्वात अस्वस्थतेचे चिंताजनक चित्र दिसत आहे.
अविनाश कोळी ।
सांगली : एकीकडे रोजगार निर्मितीच्या घोषणा, दुसरीकडे प्रतिकूल परिस्थितीचे काटेरी कुंपण... अशा दुष्टचक्रामुळे सांगली जिल्ह्यातील कामगारविश्वात अस्वस्थतेचे चिंताजनक चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कामगारांची संख्या ६ लाखाच्या घरात असली तरी, यातील २५ टक्के कामगारांनासुद्धा कायमस्वरुपी रोजगाराची खात्री मिळत नाही. कष्ट व कौशल्याच्या कोणत्याही कामात कामगारांना पुरेसा पगार मिळत नसल्याने दारिद्र्याची मिठी अधिकच घट्ट होत आहे.
सांगली जिल्ह्याचा निम्मा भाग सधन, तर निम्मा दुष्काळी आहे. त्यामुळे रोजगाराचे चित्रही असेच विभागले गेले आहे. कामगारांच्या एकूण संख्येचा विचार केला, तर यामध्ये शेतमजूर, व्यापार आणि बांधकाम क्षेत्रातील कामगार अधिक आहेत. एमआयडीसी व त्यातील उद्योगांची संख्या मर्यादित राहिल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये औद्योगिक क्षेत्रातील कामगार वाढण्याऐवजी कमी होत असल्याचे दिसत आहे. सहकार क्षेत्रातील अनेक छोट्या-मोठ्या संस्थांचे बुरुज ढासळत असल्यामुळे कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळत आहे. अशा चारही बाजूंनी कामगारविश्वाला हादरे बसत आहेत.
जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक समालोचन अहवालातील आकडेवारीचा अभ्यास केल्यास, रोजगार निर्मितीचा मोठा प्रश्न जिल्ह्यासमोर उभा राहिल्याचे दिसून येईल. सध्या रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाकडील नोंदीचा अंदाज घेतला, तर बेरोजगारांची संख्या दीड लाखावर गेली आहे. प्रत्यक्षात ही आकडेवारी मोठी आहे. बेरोजगाराची समस्येवर उपाययोजना शोधण्याची गरज भासू लागली आहे. एकूणच प्रत्येकवर्षी कामगार विश्वातील परिस्थिती अधिकच बिकट व चिंताजनक होत असल्याचे दिसत आहे.
काम करणाऱ्यांची वर्गवारी
जिल्ह्यातील २0११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येपैकी ३८ टक्के लोक काम करणारे आहेत. ५ टक्के हंगामी किंवा सीमांतिक काम करणारे आहेत. एकूण काम करणाºयांमध्ये ४0 टक्के शेतकरी, २३ टक्के शेतमजूर, ३ टक्के उद्योग व सेवा क्षेत्रात, तर ३४ टक्के व्यापार व अन्य व्यवसायात काम करणारे आहेत.
बांधकाम क्षेत्रातही नाराजी
सध्या बांधकाम क्षेत्रात काम करणाºया कामगारांची संख्या सुमारे २ लाखाच्या घरात आहे. शासकीय लाभ प्राप्त करून घेणाºया नोंदणीकृत बांधकाम कामगारांची संख्या केवळ १५ हजाराच्या घरात आहे, अशी माहिती बांधकाम कामगारांचे नेते कॉ. शंकर पुजारी यांनी दिली.
दुकाने, व्यापारी संस्था व अन्य कामगार
दुकाने १३,0१९
व्यापारी संस्था ३0,२५0
हॉटेल्स ५,६७२
चित्रपटगृहे २२0
इतर संस्था ५५४
एकूण ४९,७१५
उद्योग क्षेत्रातील
संख्या
नोंदणीकृत कारखाने ९१0
बंद अवस्थेत ७५
प्रपत्र सादर केलेले ३१0
कामगारांची संख्या २२,४४८
महिला कामगार १,७६४
अंशकालीन, रोजंदारीवरील व इतर कामगार
शासकीय संस्था-१,१६२, जिल्हा परिषद-५,८४७
नगरपरिषदा-६८