अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकास ४ वर्षे सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 08:56 PM2017-10-07T20:56:08+5:302017-10-07T20:56:33+5:30

इस्लामपूर : शिराळा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिला

Molestation of minor girl; Ekshya 4 years rigorous imprisonment | अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकास ४ वर्षे सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकास ४ वर्षे सश्रम कारावास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शिराळा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिला
जिवे मारण्याची धमकी देणाºया उदय यशवंत निकम (वय ४0, रा. शिराळा) याला
येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या दुसºया जिल्हा न्यायाधीश सौ.
के. एस. होरे यांनी ४ वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार रुपये दंडाची
शिक्षा सुनावली.

न्यायालयाने निकम याला विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक
कायद्याखाली ४ वर्षे सश्रम कारावास, २ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास ६
महिने साधी कैद, तसेच कलम ४५२ व ५0६ नुसार २ वर्षे सश्रम कारावास, २ हजार
रुपये दंड व दंड न दिल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा दिली.

या सर्वशिक्षा एकत्रितपणे भोगावयाच्या आहेत. फिर्यादीतर्फे अतिरिक्त जिल्हा
सरकारी वकील शुभांगी विक्रम पाटील यांनी काम पाहिले.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, ४ नोव्हेंबर २0१५ रोजी सायंकाळी ५.३0 च्या
सुमारास निकम मळा परिसरात विनयभंगाची ही घटना घडली होती. यातील पीडित
अल्पवयीन मुलगी दुपारच्यावेळी घरी झोपली होती. त्यावेळी आरोपीने तिला
लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन, आरडाओरडा केल्यास जिवे मारण्याची
धमकी देऊन पलायन केले होते.

याबाबत शिराळा पोलिसांत गुन्हा नोंद होता.
सरकार पक्षातर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी मुलगी, तिचे आई,
वडील, मुख्याध्यापिका व पोलिस उपनिरीक्षक डी. एन. वाईकर यांच्या साक्षी
न्यायालयाने ग्राह्य धरल्या.सरकारी वकील सौ. पाटील यांनी आपल्या युक्तिवादात या गुन्ह्याचे गांभीर्य
आणि आजची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता, आरोपीने दुष्कृत्य केले आहे. या
घटनेनंतर पीडित मुलीला शिक्षणापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे
न्यायालयाने जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. न्यायालयाने
हा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीस शिक्षा सुनावली. सहाय्यक पोलिस फौजदार
टी. ए. पवार, चंद्रकांत शितोळे यांनी खटल्याकामी सहकार्य केले.

Web Title: Molestation of minor girl; Ekshya 4 years rigorous imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.