निवृत्तीनंतर पोलिसांना घरे मिळावीत : धनंजय जाधव -सांगलीत निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी कल्याण संघटनेचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:07 PM2018-05-19T23:07:21+5:302018-05-19T23:07:21+5:30

सेवानिवृत्तीनंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरे मिळावीत, यासाठी शासनाने पोलीस कल्याण विभाग स्थापन केला पाहिजे, असे मत मुंबईचे सेवानिवृत्त पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांनी व्यक्त केले.

Police to get houses after retirement: Dhananjay Jadhav - A retired police officer in Sangli, a meeting of employees' welfare organization | निवृत्तीनंतर पोलिसांना घरे मिळावीत : धनंजय जाधव -सांगलीत निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी कल्याण संघटनेचा मेळावा

निवृत्तीनंतर पोलिसांना घरे मिळावीत : धनंजय जाधव -सांगलीत निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी कल्याण संघटनेचा मेळावा

googlenewsNext

सांगली : सेवानिवृत्तीनंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरे मिळावीत, यासाठी शासनाने पोलीस कल्याण विभाग स्थापन केला पाहिजे, असे मत मुंबईचे सेवानिवृत्त पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांनी व्यक्त केले. याचा पाठपुरावा करण्यासाठी निवृत्तांनी संघटित होऊ लढा दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याण असोसिएशनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा मेळावा झाला. त्यावेळी जाधव बोलत होते.पोलीस मुख्यालयातील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक रामराव वाघ, निवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रकाश घार्गे, मदन चव्हाण, आर. के. पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष व निवृत्त पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत शिंदे, उपाध्यक्ष गजानन शिंदे उपस्थित होते.

जाधव म्हणाले, निवृत्तीनंतर अधिकारी व कर्मचाºयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. निवृत्त पोलिसांना आधार देण्यासाठी संघटनेची स्थापना झाली आहे. यासाठी सर्वांनी संघटित राहिले पाहिजे. निवृत्तीनंतर मानसिकदृष्ट्या सक्षम रहावे, कोणत्याही गोष्टीची काळजी करुन प्रकृती बिघडवून घेऊ नका, स्वत:ला सकारात्मक गोष्टीत गुंतवून आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.

रामराव वाघ म्हणाले की, पोलीस दलात सेवा बजावताना सर्वजण धकाधकीचे जीवन जगतात. ज्या सेवेमुळे आपल्याला नाव, पद, प्रतिष्ठा मिळाली त्याचाही प्रत्येकाने सन्मान ठेवला पाहिजे. आपल्याला न्याय हक्कासाठी हिंसक आंदोलन करता येत नाही.

सेवानिवृत्तीनंतर शासकीय सोयी-सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे. सातव्या वेतन आयोगाचा लाभ कधी मिळणार? आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे, असे प्रभाकर घार्गे यांनी सांगितले.
निवृत्तीनंतर स्वत:साठी जगले पाहिजे. संघटनेतर्फे निवृत्तांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचे आवाहन मदन चव्हाण यांनी केले. यावेळी वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या निवृत्त अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला. गजानन शिंदे यांनी आभार मानले.

जिल्ह्यात सहाशे सभासद : चंद्रकांत शिंदे
चंद्रकांत शिंदे यांनी प्रास्ताविकात, जिल्ह्यात सहाशेहून अधिक सभासद झाले आहेत. ही संख्या लवकरच हजारावर जाईल. भविष्यनिर्वाह निधीसह अन्य सुविधांचा लाभ असूनही त्या वेळेवर मिळत नाहीत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीच संघटना स्थापन केली असल्याचे त्यांनी सांगितले.

सांगलीत शनिवारी निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचाºयांच्या मेळाव्याचे उद्घाटन दीपप्रज्ज्वलनाने झाले. यावेळी डावीकडून मदन चव्हाण, आर. के. पाटील, धनंजय जाधव, रामराव वाघ, चंद्रकांत शिंदे, गजानन शिंदे उपस्थित होते.

Web Title: Police to get houses after retirement: Dhananjay Jadhav - A retired police officer in Sangli, a meeting of employees' welfare organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.