सांगली जिल्ह्यासाठी रांजणी येथील जागेचा ‘ड्रायपोर्ट’साठी प्रस्ताव- : संजयकाका पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:58 AM2017-11-17T00:58:47+5:302017-11-17T01:01:33+5:30
सांगली : जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ड्रायपोर्टकरिता आम्ही रांजणी येथील जागेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडून या प्रकल्पासाठी २0 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
सांगली : जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ड्रायपोर्टकरिता आम्ही रांजणी येथील जागेचा प्रस्ताव दिला असून, केंद्र शासनाकडून या प्रकल्पासाठी २0 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ व प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
खा. पाटील म्हणाले की, हे एक कोरडे बंदर असणार आहे. फुले, द्राक्षे, डाळिंब, दूध अशा शेती व शेतीपूरक उद्योगातील उत्पादनांना ते उपयोगी ठरणार आहे. येथून थेट निर्यात करण्यासाठी याठिकाणी संबंधित सर्व शासकीय कार्यालयेही थाटली जाणार आहेत. या पोर्टचा फायदा सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा, सोलापूर, विजापूर, बेळगाव या जिल्ह्यातील शेतकºयांनाही होणार आहे. परदेशातून प्रक्रियेसाठी येणाºया कच्च्या मालासाठीही हे बंदर उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी उद्योगाच्या वाढीस चालना मिळेल.
बंदर झाल्यानंतर याठिकाणी रस्ते, वीज, शीतगृहे, गोदामे यासारख्या सुविधांचा लाभही जिल्ह्याला होणार आहे. त्यामुळे हा निर्णय जिल्ह्यासाठी अत्यंत लाभदायी आहे.याचठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यातून निर्माण होणाºया विजेमुळे सिंचन योजनांसमोरील विजेचा प्रश्न निकालात निघेल. अनेकदा सिंचन योजना वीजबिलाअभावी बंद पडतात. सौरऊर्जा प्रकल्पसुद्धा आमच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे.
स्पाईस पार्क उभारण्याचेही प्रयत्न आहेत. लोणचे व चटण्यांची मोठी बाजारपेठ या माध्यमातून तयार होईल. जिल्ह्यातील अशा उद्योगाला निर्यातीचे दरवाजे खुले होतील, असेही ते म्हणाले. यावेळी मकरंद देशपांडे उपस्थित होते.
'जागेची उपलब्धता मोठी
शासनाच्याच मालकीची रांजणी येथील २ हजार २00 एकर जागा उपलब्ध आहे. याच जागेचा प्रस्ताव आम्ही केंद्र शासनाकडे दिला आहे. प्रकल्पासाठी २ हजार एकर जागा लागेल. या जागेच्या बाजूनेच विजापूर-गुहागर हा राष्टÑीय महामार्ग प्रस्तावित आहे. त्यामुळे आपोआप रस्त्याचाही प्रश्न मार्गी लागेल. या प्रकल्पाचा विकास आराखडा येत्या आठवड्याभरात निश्चित होणार आहे, असे खा. पाटील म्हणाले.
‘टेंभू’साठी ५५0 कोटींची मागणी
ताकारी व म्हैसाळ योजनेसाठी यापूर्वीच पंतप्रधान सिंचन योजनेतून निधीची तरतूद झाली आहे. टेंभूसाठी आणखी ५५0 कोटी रुपयांची मागणी आम्ही केली आहे. नोव्हेंबर २0१९ पर्यंत सिंचन योजनांची कामे पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे खा. पाटील यांनी सांगितले.