सांगली : सांगली, कोल्हापुरातील पाच महिलांची चौकशी : गर्भपाताची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 04:40 PM2018-09-18T16:40:52+5:302018-09-18T17:23:13+5:30

येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये गर्भपात केलेल्या नऊ महिलांपैकी पाच महिलांना मंगळवारी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

Sangli: Five women in Sangli, Kolhapur probe: miscarriage confession | सांगली : सांगली, कोल्हापुरातील पाच महिलांची चौकशी : गर्भपाताची कबुली

सांगली : सांगली, कोल्हापुरातील पाच महिलांची चौकशी : गर्भपाताची कबुली

Next
ठळक मुद्दे‘सिव्हिल’च्या डॉक्टरची चौगुले हॉस्पिटलमध्ये ओपीडीप्रत्येक महिलेकडे स्वतंत्रपणे चौकशीसांगली व कोल्हापुरातील महिलांचा समावेशगर्भपातप्रकरणी डॉॅक्टर पतीला इचलकरंजीत अटक-गर्भपातास महिला पाठविल्यामेहुणा फरारीच : सांगली, कोल्हापुरातील डॉक्टरांची नावे निष्पन्न

सांगली : येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये गर्भपात केलेल्या नऊ महिलांपैकी पाच महिलांना मंगळवारी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. यामध्ये सांगली व कोल्हापुरातील महिलांचा समावेश आहे. या महिलांनी गर्भपात केल्याची कबुली दिली आहे. तसे त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.

दरम्यान, वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुबोध उगाणे हे चौगुले हॉस्पिटलमध्ये बाह्यरुग्ण (ओपीडी) विभाग चालवित होते, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.

म्हैसाळ (ता. मिरज) येथील गर्भपात व भ्रूणहत्याकांडाने राज्य हादरून गेले होते. डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेसह १४ संशयितांना अटक केली होती. या प्रकरणाला अजून वर्ष पूर्ण झाले नाही, तोपर्यंत चार दिवसांपूर्वी सांगलीतही गर्भपात व भ्रूणहत्येचे प्रकरण उघडकीस आले. नऊ महिलांचा गर्भपात केल्याची कागदपत्रे व त्यांचे केसपेपर सापडले होते.

या सर्व महिला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांना मंगळवारी सकाळी चौकशीसाठी बोलाविले होते. या महिला पतीसह सकाळी अकरा वाजता पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या कार्यालयात आल्या. प्रत्येक महिलेकडे स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. या महिलांनी गर्भपात कधी केला? गर्भपात करण्यामागे काय कारण होते? त्यांना गर्भपातासाठी चौगुले हॉस्पिटलमध्ये कोणत्या डॉक्टरने पाठविले? सोनोग्राफी तपासणी कुठे केली? या सर्व बाबींचा उलगडा जबाबातून करण्यात आला. याशिवाय संंबंधित महिलांच्या पतींकडेही चौकशी करण्यात आली.

 

गर्भपातप्रकरणी डॉॅक्टर पतीला इचलकरंजीत अटक
 

मेहुणा फरारीच : सांगली, कोल्हापुरातील डॉक्टरांची नावे निष्पन्न; गर्भपातास महिला पाठविल्या

सांगली : येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये बेकायदा महिलांचा गर्भपात करून भ्रूणहत्या केल्याप्रकरणी डॉ. विजयकुमार शामराव चौगुले (वय ४३, रा. सिद्धिविनायक नक्षत्र अपार्टमेंट, विश्रामबाग) यास मंगळवारी सकाळी इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथे अटक करण्यात आली. त्याचा मेहुणा डॉ. स्वप्नील जगवीर जमदाडे हा अजूनही फरारी आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध भागात रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, गर्भपातासाठी महिला पाठविणाºया सांगली व कोल्हापुरातील काही डॉक्टरांची नावे निष्पन्न झाली आहेत. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाने चार दिवसांपूर्वी चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकून बेकायदा गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आणले होते. याप्रकरणी चौगुले दाम्पत्यासह डॉ. स्वप्नील जमदाडे याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. रुग्णालयावर टाकलेल्या छाप्यात गर्भपाताची कीटस्, औषधी गोळ्या, इंजेक्शनचा साठा जप्त केला होता. गर्भपात केलेल्या महिलांचे केसपेपर व तसेच आक्षेपार्ह कागदपत्रेही सापडली होती. आतापर्यंतच्या तपासात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ महिलांचा गर्भपात केल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासामध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

सोमवारी सकाळी डॉ. रूपाली चौगुले हिला अटक केली होती. पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच डॉ. विजयकुमार चौगुले हा पसार झाला होता. तो इचलकरंजी येथे नातेवाईकांकडे आश्रयाला असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या पथकाने नातेवाईकांच्या घरातून त्याला अटक केली.

Web Title: Sangli: Five women in Sangli, Kolhapur probe: miscarriage confession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.