सांगली ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसकडे १११, राष्ट्रवादीला ७६ ग्रामपंचायती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 05:22 PM2017-10-17T17:22:15+5:302017-10-17T17:29:29+5:30
सांगली जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पिछाडीवर राहिलेल्या काँग्रेस पक्षाच्या ताब्यात १११ ग्रामपंचायती आल्या असून, ७६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दमदार कामगिरी केलेल्या भाजपला ग्रामीण जनतेने झिडकारल्याचे चित्र आहे.
सांगली , दि. १७ : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पिछाडीवर राहिलेल्या काँग्रेस पक्षाच्या ताब्यात १११ ग्रामपंचायती आल्या असून, ७६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दमदार कामगिरी केलेल्या भाजपला ग्रामीण जनतेने झिडकारल्याचे चित्र आहे. केवळ ६२ ग्रामपंचायतींवर त्यांना समाधान मानावे लागले आहे. खानापूर तालुक्यात ४६ ग्रामपंचायतींपैकी २२ ग्रामपंचायतींवर भगवा फडकवून दमदार एन्ट्री केली आहे.
राष्ट्रवादीने वाळवा, शिराळा, तासगाव तालुक्यातील गड राखण्यात यश मिळविले असले तरी, जत, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात निराशाजनक कामगिरी आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचे आतापर्यंत जाहीर निकाल
पक्षनिहाय मिळालेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे
वाळवा : ५० ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी : ३७,भाजप आणि सदाभाऊ खोत आघाडी ६, काँग्रेस १, अन्य ६,
शिराळा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी १९, भाजप ७, कॉँग्रेस १,
कडेगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेस ३१, भाजप १२,
पलूस तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेस ११, भाजप ४, राष्ट्रवादी १,
तासगाव २६ ग्रामपंचायतींपैकी भाजप १६, राष्ट्रवादी १०,
जत तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींपैकी भाजप १६, काँग्रेस ३३, राष्ट्रवादी २, अन्य १०,
कवठेमहांकाळ तालुक्यातील २७ पैकी भाजप ८, काँग्रेस ३, राष्ट्रवादी ४, शिवसेना १, अजितराव घोरपडे आघाडी ११,
खानापूर तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेस २४, शिवसेना २१, अन्य १०,
शिराळा तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींपैकी भाजप १६, राष्ट्रवादी २२ आणि काँग्रेसला ८ जागा मिळाल्या आहेत.
सांगली जिल्ह्यातील पक्षीय बलाबल
- काँग्रेस १११
- राष्ट्रवादी ७६
- भाजप ६२
- शिवसेना २२
- अन्य ३७