सांगली : सांगली-मिरजेतील दोन रुग्णालये सील, गर्भपात प्रकरणानंतर तपासणी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 11:56 PM2018-09-21T23:56:03+5:302018-09-21T23:58:29+5:30

येथील चौगुले मॅटर्निटी हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणानंतर महापालिकेच्या आरोग्य पथकांनी शुक्रवारी सांगली-मिरजेतील सर्वच रुग्णालयांची झडती घेण्याचे काम सुरू केले. त्याअंतर्गत सांगलीच्या हनुमाननगरमधील मोहिते हॉस्पिटल आणि मिरजेतील अ‍ॅपेक्स हॉस्पिटल सील केले

Sangli: Two hospitals in Sangli-Mirage seal, after examining the abortion case | सांगली : सांगली-मिरजेतील दोन रुग्णालये सील, गर्भपात प्रकरणानंतर तपासणी मोहीम

सांगली : सांगली-मिरजेतील दोन रुग्णालये सील, गर्भपात प्रकरणानंतर तपासणी मोहीम

Next
ठळक मुद्देअ‍ॅपेक्स हॉस्पिटलचे चालक इम्तियाज मुल्ला बीएचएमएस असून, ते आंतररुग्ण विभाग चालवित असल्याचे निष्पन्नआॅपरेशन थिएटर, खाटांची खोली सील केली.

सांगली : येथील चौगुले मॅटर्निटी हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणानंतर महापालिकेच्या आरोग्य पथकांनी शुक्रवारी सांगली-मिरजेतील सर्वच रुग्णालयांची झडती घेण्याचे काम सुरू केले. त्याअंतर्गत सांगलीच्या हनुमाननगरमधील मोहिते हॉस्पिटल आणि मिरजेतील अ‍ॅपेक्स हॉस्पिटल सील केले. मोहिते हॉस्पिटलच्या चालक डॉ. सुनीता मोहिते बीएएमएस असून त्या प्रसुतिगृह चालवित होत्या, तर अ‍ॅपेक्स हॉस्पिटलचे चालक इम्तियाज मुल्ला बीएचएमएस असून, ते आंतररुग्ण विभाग चालवित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आठवडाभरापूर्वी सांगलीत चौगुले हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात प्रकरण उजेडात आले. त्यानंतर आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी महापालिकेची दहा पथके नियुक्त करून शहरातील सर्वच रुग्णालयांची झाडाझडती घेण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार या पथकांनी शुक्रवारी सांगली व मिरजेत काही रुग्णालयांची तपासणी केली. सांगलीत डॉ. छाया हंकारे व डॉ. सुमन अनिगोळ, किरण शिंदे, सुरेंद्र शिंदे, नीलेश गोधळे यांच्या पथकाने हनुमाननगर पहिल्या गल्लीत सुरू असलेल्या डॉ. सुनीता मोहिते यांच्या मोहिते हॉस्पिटल या प्रसुतिगृहाची तपासणी केली. यात डॉ. मोहिते बीएएमएस असून महापालिकेकडे रुग्णालयाची नोंद नसल्याचे आढळून आले. आॅपरेशन थिएटर आणि तीन खाटांचे रुग्णालय असल्याचे दिसून आले. यामुळे आॅपरेशन थिएटर, खाटांची खोली सील केली.

मिरजेतही डॉ. रवींद्र ताटे, डॉ. धुमाळ, सुरेंद्र शिंदे, राहुल हुलवान यांच्या पथकाने डॉ. इम्तियाज मुल्ला यांच्या अ‍ॅपेक्स रुग्णालयाची तपासणी केली. यात हे रुग्णालय महापालिकेकडे नोंदच नसल्याचे आढळून आले. तेथे दहा बेडही आढळून आले आहेत. चौकशीत डॉ. मुल्ला बीएचएमएस असल्याचे समजले. त्यांनी डॉ. समीर सय्यद हे एमबीबीएस पात्र डॉक्टर त्यांच्याकडे कार्यरत असल्याचे सांगितले. डॉ. सय्यद हज यात्रेला गेल्याने ते सध्या येथे उपलब्ध नाहीत, असेही सांगितले. त्यानंतर हे रुग्णालयही सील करण्यात आले.

कॅन्सर रुग्णालयाला लाखाचा दंड
मिरजेतील सिद्धिविनायक कॅन्सर रुग्णालयालाही महापालिकेच्या पथकाने एक लाख रुपयांचा दंड केला. या रुग्णालयाने जैविक कचऱ्याची नियमानुसार व्यवस्था केलेली नाही. तसेच रुग्णालय परिसरात जैविक कचरा साठविला आहे. ही बाब निदर्शनास येताच डॉ. ताटे, स्वच्छता निरीक्षक पाटणकर, अनिल पाटील, सचिन वाघमोडे, निखिल कोलप यांच्या पथकाने दंड ठोठावला. या रुग्णालयाबाहेर ओल्या नारळाच्या करवंट्या टाकलेल्या होत्या. ओल्या नारळाच्या करवंट्या, डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. त्याची दखल घेत कारवाई करण्याचे आदेश उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिले.

Web Title: Sangli: Two hospitals in Sangli-Mirage seal, after examining the abortion case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.