गायन-वादनाच्या मैफिलीने नवरात्र महोत्सवात रंगत

By admin | Published: October 16, 2015 11:03 PM2015-10-16T23:03:31+5:302015-10-16T23:11:22+5:30

अंबाबाई संगीत सभा : श्रोत्यांची दाद

Singing and concert concert in Navaratri festival | गायन-वादनाच्या मैफिलीने नवरात्र महोत्सवात रंगत

गायन-वादनाच्या मैफिलीने नवरात्र महोत्सवात रंगत

Next

मिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत सभेत पंडित जयतीर्थ मेउंडी (हुबळी) यांचे शास्त्रीय गायन, उस्ताद फारुख लतिफ (भोपाळ) यांचे सारंगीवादन व सौ. मंगला जोशी (सांगली) यांच्या शास्त्रीय गायनास श्रोत्यांनी दाद दिली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत संगीत सभेत गायन-वादनाची मैफिल रंगली होती.
संगीत सभेच्या चौथ्यादिवशी उस्ताद फारुख लतिफ यांनी बहारदार सारंगीवादन केले. त्यांनी राग श्री आळविला. सारंगीच्या विविध स्वरछटा सादर करून त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना महेश देसाई यांनी समर्पक तबलासाथ केली. मंगला जोशी त्यांनी राग गौरी गायिला. मध्यलय तीनतालात ‘तोरे मिल’, द्रुत त्रितालात ‘जोयांकी बिल’ या चीजा आळवल्या. ‘पद्मनाभा नारायणा’ हे भजन, ‘झमक झुली आयी’ हा झुला त्यांनी सादर केला. त्यांना महेश देसाई यांनी तबलासाथ, केदार सांबारे यांनी हार्मोनियमसाथ, श्रध्दा जोशी यांनी तानपुरासाथ व राजाभाऊ कुलकर्णी यांनी तालवाद्यसाथ केली. पंडित जयतीर्थ मेउंडी यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग मेघमल्हार गायिला. त्यांना अविनाश पाटील यांनी तबलासाथ व राहुल गोळे यांनी हार्मोनियम साथ केली.
मधू पाटील, विनायक गुरव, बाळासाहेब मिरजकर, मजीद सतारमेकर, संभाजी भोसले, डॉ. शेखर करमरकर यांनी संगीत सभेचे संयोजन केले. (वार्ताहर)
मालगाव : खंडेराजुरी (ता. मिरज) येथील ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरण्याकडे पाठ फिरविल्याने १० लाखांहून अधिक थकित वीज बिलासाठी महावितरणने पिण्याच्या पाणी योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. परिणामी ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
योजना बंद असल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी कूपनलिकांचा आधार घेण्याची वेळ आली आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले असले तरी, पाणीपट्टी वसुलीवर योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. ग्रामपंचायतीने थकित पाणीपट्टी वसुलीस प्रतिसाद न देणाऱ्यांचे नळ कनेक्शन खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.
खंडेराजुरी येथील गावास ब्रह्मनाथ तलावानजीक असलेल्या विहिरीतून पिण्याचा पाणी पुरवठा करण्यात येतो. खंडेराजुरी ग्रामपंचायतीत समावेश असलेल्या गवळेवाडीसाठी विहिरीतून स्वतंत्र पाणी योजना राबविण्यात आली आहे. ग्रामपंचायत वर्षाला ६०० रुपये इतक्या अल्प दराने पाणीपट्टी आकारणी करत असतानाही, ग्रामस्थांच्या दुर्लक्षामुळे या दोन्ही योजनांसह कूपनलिकेवरील वीज कनेक्शनचे गेल्या तीन वर्षात ११ लाखाहून अधिक वीज बिल थकित होते.
गतवर्षी ७५ हजार रुपये थकित बिलापोटी भरण्यात आले. थकि त वीज बिल वाढत असल्याने मध्यंतरी ग्रामपंचायतीने दवंडीसह पाणीपट्टी वसुली मोहीम राबविली. ग्रामविकास अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या घराकडे हेलपाटे मारूनही वसुलीस प्रतिसाद न मिळाल्यानेच नळ पाणी पुरवठा योजना अडचणीत सापडली आहे.
पाणी योजनांचे सध्या १० लाख ६२ हजार ९३० रुपये वीज बिल थकित असल्याने महावितरणने तीन ठिकाणच्या पाणी पुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांवर कूपनलिकांचा आधार घेण्याची वेळ आली आहे. थकित वीज बिलातील काही रक्कम भरल्यानंतर वीज कनेक्शन जोडण्याची भूमिका महावितरणने घेतली आहे. खंडेराजुरी येथील नळ पाणी पुरवठ्याचे भवितव्य पाणीपट्टी वसुलीवर अवलंबून असल्याने ग्रामस्थांना थकित पाणीपट्टी भरण्यासाठी सहकार्य करावे लागणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Singing and concert concert in Navaratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.