कोयनेत १०३ टीएमसी पाणीसाठा, आवक कमी : महाबळेश्वरलाही पावसाची उघडीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 14:35 IST2018-09-12T14:34:20+5:302018-09-12T14:35:53+5:30
कोयना परिसरात तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. सध्या धरणात १०३.८ टीएमसी इतका साठा आहे. तर महाबळेश्वर येथे बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाची कसलीही नोंद झालेली नाही.

कोयनेत १०३ टीएमसी पाणीसाठा, आवक कमी : महाबळेश्वरलाही पावसाची उघडीप
सातारा : कोयना परिसरात तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. सध्या धरणात १०३.८ टीएमसी इतका साठा आहे. तर महाबळेश्वर येथे बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाची कसलीही नोंद झालेली नाही.
जुलै महिन्यापासून आॅगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार होती, त्यामुळे धरणे भरली. मात्र, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून वारंवार पाणी सोडण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. त्यामुळे कोयना, नवजा येथे पावसाची नोंद झाली नाही. महाबळेश्वरलाही पावसाने उघडीप दिली आहे.
कोयना परिसरात पावसाने उघडीप दिली असली तरी धरणात १०८१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.