फलटणच्या पिंपरद येथे एसटी आणि ट्रकची समोरा-समोर धडक; एसटीमधील 25 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 01:45 PM2017-09-26T13:45:51+5:302017-09-26T14:56:24+5:30

ट्रक व एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात पंचवीस जण जखमी झाले आहेत.

25 injured in ST-truck crash in Patidar border | फलटणच्या पिंपरद येथे एसटी आणि ट्रकची समोरा-समोर धडक; एसटीमधील 25 जण जखमी

फलटणच्या पिंपरद येथे एसटी आणि ट्रकची समोरा-समोर धडक; एसटीमधील 25 जण जखमी

Next
ठळक मुद्दे ट्रक व एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक, पाच गंभीर फलटण-पंढरपूर मार्गावर दुर्घटनापोलिस व ग्रामस्थांनी चालक व प्रवाशांना बाहेर काढलेएसटी चालक रवींद्र जाधव, ट्रक चालक शुभम रणपिसे गंभीर

फलटण-  ट्रक व एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात पंचवीस जण जखमी झाले आहेत. हा अपघात फलटण-पंढरपूर मार्गावरील पिंपरद हद्दीत मंगळवारी सकाळी साडे अकराला झाला. यामध्ये चालकासह पाच जण गंभीर झाले. जखमींवर फलटणच्या खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड आगाराची विजापूर-पिंपरी चिंचवड एसटी (एमएच १४ बीटी ३१८२) पिंपरी चिंचवडकडे निघाली होती. त्याचवेळी फलटणकडून पंढरपूरकडे निघालेला ट्रक (एमएच २५ यु ११६६) पिंप्रद हद्दीत आला असता एसटी व ट्रक यांच्या जोरदार धडक झाली. 

हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहने चालकाच्या बाजूला धडकल्याने एसटी व ट्रक एकमेकांत घुसले. पुढील दहा फुटांपर्यंत बाजू फाटत गेली. यामध्ये दोन्ही चालक अडकले होते. 

ग्रामस्थांनी तातडीन अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस व ग्रामस्थांनी चालक व प्रवाशांना बाहेर काढले. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावून खासगी व सरकारी दवाखान्यात हलविले. या अपघातात पंचवीस जण जखमी झाले. त्यात एसटी चालक रवींद्र जाधव व ट्रक चालक शुभम रणपिसे हे गंभीर जखमी झाले.

Web Title: 25 injured in ST-truck crash in Patidar border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात