लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळली सातारानगरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 11:37 PM2017-10-19T23:37:49+5:302017-10-19T23:37:53+5:30

Attention-eyed Saturnagari with lamps! | लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळली सातारानगरी !

लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळली सातारानगरी !

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : लक्ष्मी पूजनानिमित्त लक्ष-लक्ष दिव्यांनी सातारा शहर उजळून निघाले होते. वसाहती, बंगले, दुकानांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी सातनंतर लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर आकाशात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
दिवाळीच्या चार दिवसांमध्ये लक्ष्मी पूजनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. लक्ष्मी पूजनापूर्वी घराचे अंगण, दुकानांसमोर सडा-रांगोळी अन् पणत्या लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती.
साताºयात सायंकाळी सव्वा सहानंतर लक्ष्मी पूजनाला प्रारंभ झाला. घरोघरी, दुकानांमधून कुबेर-लक्ष्मीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
सुमारे दोन तास पूजन करण्यात आले असले तरी रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरूच होती. राजवाडा, पोवई नाका, राजपथावर सर्वाधिक आतषबाजी सुरू होती. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.
यंदा साताºयाच्या बाजारपेठेत दिवाळीनिमित्त नवी दालने सुरू झाली आहेत. या दुकांनामध्येही लक्ष्मी पूजन शास्त्रोक्तपद्धतीने करण्यात आले. घरातल्या लहान मुलांसह महिलांनीही नवे कपडे परिधान करून लक्ष्मी पूजन केले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरूच होती.
यवतेश्वरमध्ये लक्ष्मी पूजनादिवशी यात्रा
यवतेश्वर येथे लक्ष्मी पूजनादिवशी यात्रा भरते. या यात्रेला यवतेश्वर, आंबेदरे, सारखळ, गवडी, सांबरवाडी तसेच सातारा शहर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आंब्याचा मोहर. पूर्वीपासूनच या यात्रेत आंब्याचा मोहर शोधण्याचा मान गुरव समाजाला असतो. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान ‘यवतोबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात पालखीची मिरवणूक आंब्यापर्यंत काढण्यात आली. आंब्याचा मोहर पुजारी हातात घेऊन पालखी पुन्हा मंदिराकडे येते. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची प्रचंड गर्दी असते.

Web Title: Attention-eyed Saturnagari with lamps!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.