महाबळेश्वर परिसरातून जागतिक पर्यटनस्थळी पंधरा टन कचरा गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:26 AM2017-12-14T00:26:17+5:302017-12-14T00:28:35+5:30
महाबळेश्वर : शहराच्या मुख्य भागामध्ये बसस्थानक परिसर येत असून, येथे नगरपालिकेच्या वतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम
महाबळेश्वर : शहराच्या मुख्य भागामध्ये बसस्थानक परिसर येत असून, येथे नगरपालिकेच्या वतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामुळे बसस्थानकासह एसटी आगार परिसरातून सुमारे १५ टनाहून अधिक कचरा व प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या.
‘महाबळेश्वर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी तयार केलेल्या कृती आराखड्यासाठी स्थानिकांसह हॉटेल व्यावसायिक, व्यापारी तसेच शहरवासीयांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी केले.
महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरमध्ये दररोज हजारो पर्यटक भेट देतात. याच महाबळेश्वरला वर्षाकाठी पंधरा ते वीस लाख पर्यटक भेटी देतात. काही पर्यटक स्वत:च्या वाहनाने येतात तर काही पर्यटक एसटीने बसस्थानकामध्ये उतरतात. परंतु बसस्थानक परिसरच स्वच्छ नसतो.
या परिसरातील पाहणी पालिकेने केल्यानंतर या परिसरातील अंतर्गत भागांत बसस्थानक कर्मचाºयांनी दहा ते पंधरा वर्षे स्वच्छता मोहीम राबविण्यातच आली नाही, असे दिसून आले. महाबळेश्वर पालिकेकडून सलग तीन दिवस बसस्थानक परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. बसस्थानक परिसर हा शहराच्या मुख्य भागामध्ये येत असून, हा अंदाजे दोन ते तीन एकरामध्ये पसरलेला आहे. पुढे बसस्थानक तर मागील बाजूस एसटी आगार आहे. बसस्थानकात अंतर्गत भागांत वाढलेली झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्यांचा खच साठलेला होता.
पालिकेने तीन दिवस सफाई कामगार लावून या परिसरातून गेली दहा ते पंधरा वर्षांचा कचरा, प्लास्टिक पिशव्या दोनशेहून अधिक व एसटी धुतल्या जातात. या ठिकाण्यामधील प्लास्टिक कचरा डंपर लावून जेसीबीच्या साह्याने काढण्यात आला. यामुळे बसस्थानक परिसर सुंदर व स्वच्छ दिसू लागला. स्थानिक नागरिकांमधून नगरपालिकेचे कौतुक होऊ लागले आहे.
पंधरा वर्षांत प्रथमच स्वच्छता
महाबळेश्वर बसस्थानक परिसरात झाडलोट करणारे एसटी महामंडळाने कर्मचाºयांची संख्या वाढवली आहे. नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानामुळे पंधरा वर्षांपासूनचा १५ टन कचरा गोळा करण्यात आला. पालिकेच्या पुढाकाराने बसस्थानक परिसरात जवळपास दहा वर्षांनंतरच रंगरंगोटीचे काम सुरू केले आहे. स्वच्छता मोहिमेमुळेच बसस्थानक परिसर आगार झाल्यापासून पहिल्यांदाच स्वच्छ करण्यात आला. यामुळे शहरातून व पर्यटकांमधून कौतुक होऊ लागले आहे.