गोडोलीत वाहतुकीसाठी मिळतो रस्ता कधी कधी!, वाढीव अतिक्रमणे आणि भाजी मंडईमुळे रोज होतेय वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:05 PM2017-12-02T12:05:47+5:302017-12-02T12:16:44+5:30
रस्त्याची निर्मिती वाहतुकीसाठी झाली आहे. मात्र, सातारा शहरातील गोडोली चौक परिसरातील रस्ते विक्रेत्यांसाठीच निर्माण केल्याचा भास होत आहे. सकाळी आणि संध्याकाळी वर्दळीच्या वेळेत या रस्त्यावर चक्क ट्रॅफिक जाम होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता कधीतरीच मिळतो, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सातारा : रस्त्याची निर्मिती वाहतुकीसाठी झाली आहे. मात्र, गोडोली चौक परिसरातील रस्ते विक्रेत्यांसाठीच निर्माण केल्याचा भास होत आहे. सकाळी आणि संध्याकाळी वर्दळीच्या वेळेत या रस्त्यावर चक्क ट्रॅफिक जाम होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता कधीतरीच मिळतो, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
शहरातील औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या या रस्त्याकडेला आता भलतीच वसाहत वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजू लागले आहेत. गोडोलीतील साईबाबा मंदिरासमोर आता चक्क भाजी मंडई वसू लागली आहे.
संध्याकाळी भाज्यांच्या टोपल्या, नोकरीच्या ठिकाणावरून जाणारे चाकरमानी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या गर्दीतून वाट काढून चालणे कठीण होते.
सर्वाधिक वर्दळ असलेल्या या चौकात प्रचंड बेशिस्तीने वाहने बेदिक्कतपणे चालवली जातात. या सर्वांवर अंकुश ठेवण्यासाठी सातारा पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे.