ऐतिहासिक झºयावर चक्क बांधकाम अजिंक्यतारा पायथ्यालगत प्रकार : इतिहासप्रेमींकडून नाराजी; पाण्याचा स्त्रोत मुजविल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:58 PM2018-01-18T23:58:35+5:302018-01-18T23:58:51+5:30
सातारा : अजिंक्यताºयाच्या पायथ्याला कोकणी वस्तीत असणाºया शिवकालीन नागझºयावर चक्क घरे बांधली गेली असून, या झºयावरच अतिक्रमण झाल्याने बाराही पाणी असणारा हा झरा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
सातारा : अजिंक्यताºयाच्या पायथ्याला कोकणी वस्तीत असणाºया शिवकालीन नागझºयावर चक्क घरे बांधली गेली असून, या झºयावरच अतिक्रमण झाल्याने बाराही पाणी असणारा हा झरा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याची प्रशासनाने दखल न घेतल्याने इतिहाप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
किल्ले अजिंक्यताºयावर एकूण चार झरे आहेत. या झºयांना किल्ल्यावरील तळ्यातील पाणी पाझरून भूगर्भातून झºयात येते. त्यातील एक झरा हा मंगळाई मंदिराजवळ तर दुसरा मारुती मंदिराच्या खालच्या बाजूला आहे. तिसरा झरा माची पेठेतील कोकणी वस्तीत आहे. चौथा झरा हा किल्ल्यावरील वनविभागाने केलेल्या रस्त्यामुळे बंद झाला आहे.
सध्या अस्तित्वात असणाºया तीन झºयांपैकी मंगळाई मंदिराजवळील व माची पेठेतील या दोन झºयांना पाणी आहे. तर मारुती मंदिराच्या खालच्या बाजूला असणाºया झºयाला पावसाळ्यात पाणी असते.
माची पेठेतील असणारा नागझरा हा मानवी वस्तीत असल्याने या शिवकालीन झºयावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, या झराला मुबलक पाणी असून देखील मानवी वस्तीमुळे या पाण्यात सांडपाणी मिसळत असल्याने हे पाणी सध्या कोणीही वापरत नाही.माची पेठेतील नागझºयाचे पाणी पूर्वी जलमंदिरामध्ये पूजेसाठी वापरले जायचे. तसेच दुष्काळावेळी या झºयाला भरपूर पाणी असल्याने नागरिक या झºयातील पाणी पिण्यासाठी घेऊन जात होते. त्यामुळे दुष्काळात हा झरा वरदानी होता. तर बाकीचे झरे हे प्राण्यासाठी उपयोगी पडत होते. परंतु अलीकडे किल्ल्यावर वाढत जाणाºया मानवी वस्तीमुळे हे झरे नामशेषाच्या होणाच्या मार्गावर आहेत.
काही ठिकाणी झºयावर चक्क बांधकाम करण्यात आले आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. पाण्याचा स्त्रोत शेजारीच असताना तो मुजविण्याचा घाट काहींना घातला आहे. पुरातत्व, बांधकाम आणि पालिका या सगळ्याच प्रशासनाचे या नैसर्गिक झºयांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप इतिहासप्रेमींकडून होत आहे. घराचे बांधकाम करण्यात आलेल्या झºयांमध्ये स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी आहे. परंतु याकडे नागरिक दुर्लक्ष करत आहेत. कांची कामकोटी शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती हे साताºयात मुक्कामासाठी आले असताना झºयाजवळ एक महिना झोपडी बांधून वास्तव्य केले होते. त्यावेळी त्यांना या झºयातील पाणी उपयोगी पडले होते.
जागेसाठी वाट्टेल ते..
जमिन खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी झोपडी टाकून लोक वास्तव्य करत आहेत. अजिंक्यतारा, बोगदा परिसरातील डोंगर भागामध्येही झोपड्या रातोरात उभ्या राहू लागल्या आहेत. त्यामुळे जागेसाठी पाण्याचे स्त्रोत मुजविण्यासही लोक मागे पुढे पाहात नाहीत.
साताºयाचा इतिहास जगभर पोहोचला आहे. अजूनही ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे साताºयात पाहायला मिळतात. मात्र, पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे असे दुर्मीळ झरे कोनाड्यात पडत आहेत. - प्रा. सुभाष कदम (इतिहास प्रेमी)