प्रोत्साहनपर लाभार्थ्यांच्या खात्यात कमी रक्कम जमा शेतकरी कर्जमाफी योजना : स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:03 AM2017-12-24T00:03:38+5:302017-12-24T00:03:52+5:30

सातारा : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होत असताना काही प्रोत्साहनपर लाभार्थ्यांना कमी पैसे मिळू लागल्याच्या तक्रारी

Incentive to the beneficiaries 'accounts, the amount of deposited lesser farmers' debt relief scheme: Swabhimani Shetkari Sanghatana is aggressive | प्रोत्साहनपर लाभार्थ्यांच्या खात्यात कमी रक्कम जमा शेतकरी कर्जमाफी योजना : स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

प्रोत्साहनपर लाभार्थ्यांच्या खात्यात कमी रक्कम जमा शेतकरी कर्जमाफी योजना : स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

googlenewsNext

सातारा : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होत असताना काही प्रोत्साहनपर लाभार्थ्यांना कमी पैसे मिळू लागल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्याना याचा फटका बसणार असून, याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.

राज्य शासनाने जून महिन्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज भरून घेण्यात आले. जिल्ह्यातील सुमारे दोन लाख ४० हजार शेतकºयांनी अर्ज भरले आहेत. तर राज्य शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम टाकू, असा केलेला दावा पूर्णपणे फसला.
तसेच दिवाळीनंतरही काही मोजक्याच शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले. विरोधकांच्या राजकीय हल्ल्यापासून बचावासाठी नागपूर अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्य शासनाने कर्जमाफीची प्रक्रिया गतिमान केली. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होऊ लागली. ११ डिसेंबरपर्यंत शेतकरी कर्जमाफीसाठी २३३ कोटी ६३ लाख सहा हजार ९२८ रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी १८१ कोटी २९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. तसेच नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर लाभाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असलीतरी काहींना कमी रक्कम मिळत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

प्रोत्साहनपर लाभाचे काही टप्पे करण्यात आले आहेत. त्यामध्ये १५ हजारांपेक्षा कमी कर्ज असणाºयांना कर्जाऐवढी रक्कम मिळणार आहे. तर १५ ते ६० हजार रुपयांच्या दरम्यान कर्जधारकांना १५ हजार आणि ६० हजारांपासून एक लाखापर्यंत कर्ज असणाºयांना कर्जाच्या २५ टक्के रक्कम मिळणार आहे. तसेच एक लाखाच्या पुढे कर्ज असणाºयांना २५ हजार रुपये प्रोत्साहनपर मिळणार आहेत. सध्या शेतकºयांच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम जमा होत आहे; पण काहींच्या नावावर कमी रक्कम जमा होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

Web Title: Incentive to the beneficiaries 'accounts, the amount of deposited lesser farmers' debt relief scheme: Swabhimani Shetkari Sanghatana is aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.