२१४ ठिकाणी ‘मापात पाप’ वजन मापे विभाग : जिल्ह्यात फेबु्रवारीअखेर ८८ लाख ६१ हजार २६५ रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:26 AM2018-03-15T01:26:01+5:302018-03-15T01:26:01+5:30
सातारा : मापात पाप करून वस्तूंची विक्री करणाऱ्या २१४ व्यावसायिकांवर चालू आर्थिक वर्षात खटले दाखल करण्यात आले आहेत. वजनी मापे कायद्यानुसार १५५ तर पॅकेजड फूड कायद्यांतर्गत
सागर गुजर ।
सातारा : मापात पाप करून वस्तूंची विक्री करणाऱ्या २१४ व्यावसायिकांवर चालू आर्थिक वर्षात खटले दाखल करण्यात आले आहेत. वजनी मापे कायद्यानुसार १५५ तर पॅकेजड फूड कायद्यांतर्गत ५९ खटले दाखल केले असून, ८८ लाख ६१ हजार २६५ रुपयांचे पडताळणी मुद्रांक शुल्क वसूल करण्यात आले आहे.
सातारा येथील वजन काटे कार्यालयाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे. वजन करून वस्तूंची विक्री करणाºया व्यावसायिकांनी दरवर्षी आपल्याकडील वजनी काटे छापून घेणे आवश्यक असते. वजन काटे विभाग दरवर्षी कॅम्प लावून वजनी काटे तपासून देतात. या कार्यालयाकडे असणाºया वजनांशी ताळमेळ लावून वजन काटे तपासून दिले जातात. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक काट्यांचा वापर सुरू झाला असला तरी दुर्गम भागात अजूनही जुन्या पद्धतीचे वजन, काटे, तराजू वापरले जातात. अनेकदा अशा वस्तू छापून घेत अधिकृत करून घेतल्या जात नाहीत. वजन छापून न घेणाºया दुकानदारांवर धाडी टाकून कारवाईचे सत्र नेमके फेब्रुवारी, मार्च महिन्यात सुरू होते. मार्च २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत वजन काटे विभागाने ४५९ खटले दाखल केले. संबंधित व्यावसायिकांकडून ९३ लाख ९९ हजार ४५७ रुपयांचे पडताळणी व मुद्रांक शुल्क वसूल करण्यात आले. पॅकेजड कम्युडिज कायद्यांतर्गत १२७ खटले दाखल केले. या अंतर्गत १९ लाख १९ हजार ५० रुपयांची वसुली खात्यामार्फत तडजोडीने मिटविलेल्या प्रकरणांत करण्यात आली.
दरम्यान, चालू वर्षात पडताळणी मुद्रांक शुल्क ८८ लाख ६१ हजार २६५ रुपये तर पॅकेजड कायद्यांतर्गत ५९ खटले दाखल करुन ९ लाख २० हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला.
काय केला जातो झोल?
तराजूचे कान हातोड्याने ठोकतात
वजनांतील शिसे काढले जाते
वजन ग्रार्इंडरवर घासले जाते
रॉकेलच्या भांड्यात कातडी पट्टा टाकला जातो
तराजूचा काटा विशिष्ट पद्धतीने लावला जातो
वस्तू घेताना योग्य वजनात मिळते का? याची खात्री ग्राहकांनी केली पाहिजे. दुकानदारांकडील वजनाबाबत शंका आल्यास त्याची तक्रार न भीता वजन काटे कार्यालयाकडे करावी, संबंधित दुकानदारांवर कारवाई केली जाईल. ग्राहक जागृती सप्ताहातही आम्ही याबाबत जनजागृती केली आहे.
- राजेंद्र गायकवाड, सहायक नियंत्रक,
वजन व काटे कार्यालय